AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : चेन्नईचा एकतर्फी विजय, दिल्लीला पराभूत केल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

IPL 2026 Points Table DC vs CSK : संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूची या मोसमात 40 पेक्षा अधिक धावा करण्याची चौथी वेळ ठरली. चेन्नईने यासह चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवला. चेन्नईला या विजयानंतर किती फायदा झाल? जाणून घ्या.

IPL 2026 Points Table : चेन्नईचा एकतर्फी विजय, दिल्लीला पराभूत केल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
Sanju Samson and Ruturaj Gaikwad CSKImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 06, 2026 | 8:07 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला. चेन्नईने 156 धावांचं आव्हान हे 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. चेन्नई सुपर किंग्सचा हा या मोसमातील एकूण पाचवा आणि दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा दिल्लीत डीसी विरुद्धचा इतिहासातील 9 सामन्यांमधील हा एकूण सातवा विजय ठरला. चेन्नईने यासह प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. चेन्नई या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

मोसमात काही दिवस प्लेऑफसाठी एकतर्फी चुरस पाहायला मिळत होती. तेच ते 4 संघ टॉप 5 मध्ये कायम होते. मात्र आता इतर संघांनी जोरदार कमबॅक करत प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. चेन्नईनेही दिल्लीला पराभूत करत निर्णायक विजय मिळवला आहे. चेन्नईने या विजयासह प्लेऑफचा दावा मजबूत केला आहे. तर दिल्ली प्लेऑफपासून काहीशी दूर गेली आहे.

चेन्नईचा दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय

संजू सॅमसन हा चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 156 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक योगदान दिलं. संजूने 87 धावांची नाबाद खेळी केली. संजूने केलेल्या खेळीच्या जोरावर चेन्नईला 18 ओव्हरआधीच सामना जिंकता आला. दिल्लीला हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा हिशोब करणयाची संधी होती. मात्र दिल्लीने ती संधी गमावली. दोन्ही संघ 11 एप्रिलला आमेनसामने आले होते. तेव्हाही चेन्नईने दिल्ली लोळवलं होतं.

चेन्नईला विजयानंतर किती फायदा?

चेन्नईचा हा 10 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला. तर चेन्नईने 5 सामनेही गमावले आहेत. चेन्नईने विजयासह 2 गुणांची कमाई केली. चेन्नईचा नेट रनरेटही सुधारला. मात्र यलो आर्मीला पॉइंट्स टेबलमध्ये काही फायदा झालेला नाही. चेन्नईचा ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. चेन्नई नेट रनरेट हा +0.151 असा झाला आहे जो सामन्याआधी +0.005 असा होता.

दिल्ली कॅपिट्ल्सचं काय?

दरम्यान दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. दिल्ली हा सामना जिंकून चेन्नईचा हिशोब करण्यासह पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारण्याची संधी होती. मात्र दिल्लीने ही संधी गमावली. दिल्लीच्या खात्यात 10 सामन्यानंतर 8 गुण आहेत. दिल्लीने उर्वरित 4 सामने जिंकले तरी ते स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचू शकतात. मात्र दिल्लीला आता जिंकून चालणार नाही. दिल्लीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे दिल्ली उर्वरित सामन्यांत कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...