AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 26 February 2026 : होळीपूर्वी तरी विकत घेता येणार का, सोनं महागलं की स्वस्त ? 10 ग्रॅमसाठी आज किती मोजावे लागणार पैसे ?

Gold-Silver Rate Today 26 February 2026 Latest News Updates in Marathi : सोनं खरेदी म्हटलं की काळावर आठ्याच येतील, असे सध्या दर झाले आहेत. अधूनमधून किंमती खाली घसरत असल्या तरी सोनं चांदी सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच गेलेलं दिसत आहे. आज सोन्या चांदीचे दर किती आहेत ? घ्या जाणून

Gold Silver Rate Today 26 February 2026 : होळीपूर्वी तरी विकत घेता येणार का, सोनं महागलं की स्वस्त ? 10 ग्रॅमसाठी आज किती मोजावे लागणार पैसे ?
सोन्याचे आजचे दर काय ?Image Credit source: TV9
| Updated on: Feb 26, 2026 | 11:35 AM
Share

सोनं-चांदीच्या दरांपासून (Gold-Silver Rates) ते सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांपर्यंत (Sensex-Nifty), गुरुवारी सुरुवातीपासूनच मंदीचं चित्र दिसत आहे. काल बाजार बंद होईपर्यंत वेगाने वाढणारी चांदी, आज मात्र एमसीएक्स उघडताच अचानक 5000 रुपयांपेक्षा जास्त प्रति किलोने स्वस्त (Silver Price Fall) झाली, तर सोन्याचीही काही वेगळी स्थिती नव्हती. सोन्याचे दरही (Gold Rate Fall) कोसळले. तर दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीची हालचाल बदललेली दिसत होती, खरंतर सकाळी दोन्हीही जोरदार गतीने उघडले, परंतु काही मिनिटांतच ही गती मंदावली आणि ते रेड झोनमध्ये आले.

मार्केट उघडताच चांदीची किंमत इतक्या हजारोंनी घटली

गुरुवारी कमोडिटी मार्केटमध्ये सकाळी मंदी दिसली. एमसीएक्सच्या सुरुवातीच्या काळात चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 2,78,364 पर्यंत घसरले, काल बाजार बंद होताना हेच दर 2,78,364 रुपये प्रति किलोग्रॅम होते. त्या हिशोबाने 1 किलो चांदीचे दर 5804 रुपयांनी कमी झाले. 29 जानेवारी रोजी चांदीच्या किमतीने 4 लाख 20 हजार 048 हा उच्चांक गाढला होता, मात्र आता ती एकूण 1 लाख 47 हजार 488 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याची झळाळीही फिकी

मार्केटमध्ये चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही घसरण झाली. 2 एप्रिल रोजी संपणारा एमसीएक्स सोन्याचा वायदा बाजार, काल म्हणजेच बुधवारी 1,61,145 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर बंद झाला. मात्र आज सकाळी मार्केट उघ़ताच सोनं घसरून 1,60,516 वर पोहोचलं, म्हणजेच 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं एकूण 629 रुपयांनी स्वस्त झालं. जर आपण सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीकडे पाहिले तर चांदीप्रमाणेच सोन्यानेही 29 जानेवारी रोजी प्रति 10 ग्रॅम साठी 1,93,096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या मौल्यवान पिवळ्या धातूचा भाव 32,580 रुपयांनी घसरला आहे.

तुमच्या शहरात किती दर ?

मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, बंगळुरू, पुणे, नागपुर, भुवनेश्वर, विजयवाड़ा इथे आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 16, 168 रुपये ( 1 ग्रॅम), 22 कॅरेट सोन्याची किंमत 14,820 रुपये ( प्रति ग्रॅम) आणि 18 कॅरेटची किंमत 12,126 रुपये आहे.

तर दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, अयोध्या, चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,183 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,835 रुपये आणि 11 कॅरेट सोन्याचा भाव 12,141 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...