Gold Price : नवीन वर्षांत सोन्याची दमदार बॅटिंग, 5 दिवसांत 758 रुपयांनी वाढले दर, आज 10 ग्रॅमचा भाव किती?

Gold Price : नवीन वर्षांत सोन्याने पाचच दिवसांत जोरदार मुसंडी मारली.

Gold Price : नवीन वर्षांत सोन्याची दमदार बॅटिंग, 5 दिवसांत 758 रुपयांनी वाढले दर, आज 10 ग्रॅमचा भाव किती?
काय आहे सोन्याचा दर?
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 05, 2023 | 4:31 PM

नवी दिल्ली : भारतीय वायदे बाजारात (Multi Commodity Market-MCX) सोने लवकरच नवीन रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. सराफा बाजारात (Sarafa Market) सोन्याची 60 हजारी आगेकूच सुरु आहे. वायदे बाजारात सलग पाचव्या सत्रात सोने महाग झाले आहे तर चांदीच्या भावात घसरण दिसून आली. नवीन वर्षांत सोन्याने दमदार कामगिरी केली. सोन्याचा भाव (Gold Rate) पाचच दिवसांत 758 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याची घौडदौड कायम राहण्याची शक्यता आहे. तर चांदीतही (Silver Price) मोठ्या वाढीचे संकेत आहेत.

वायदे बाजारात सोन्याच्या भावात 0.19 टक्क्यांची वाढ झाली. चांदीत थोडी घसरण झाली. चांदीत 0.08 टक्के घसरण झाली. चांदीचा भाव आज 70 हजार प्रति किलोग्रॅमच्या खाली आला आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोने 0.48 टक्क्यांवी वधारले तर चांदीमध्ये 0.88 टक्क्यांची घसरण झाली होती.

गुरुवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आज (Gold Rate Today) सकाळी 09:25 वाजता 108 रुपयांनी वधारला. सोन्याचा भाव आज 55,875 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचा भाव आज 55,920 रुपयांपर्यंत पोहचला होता. गेल्या व्यापारी सत्रात MCX वर सोने 55,799 रुपयांवर बंद झाले होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीची चमक फिक्की पडली. चांदीचा भाव आज 53 रुपयांनी घसरला. चांदी 69,265 रुपये प्रति किलोग्रॅम होती. चांदी आज 68,180 रुपयांपर्यंत घसरली होती. कालच्या व्यापारी सत्रात चांदीच्या भावात 670 रुपयांची घसरण होऊन ते 69,300 रुपयांवर बंद झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वधारला तर चांदीचा भाव घसरला. सोन्याच्या भावात आज 1.04 टक्क्यांची वाढ होऊन ते 1,856.14 डॉलर प्रति औस झाले तर चांदीत घसरण कायम होती. चांदीत आज 0.92 टक्क्यांची घसरण होऊन ते 23.75 डॉलर प्रति औसवर पोहचले.