AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची आनंदवार्ता, पुन्हा साधला स्वस्ताईचा मुहूर्त

Gold Silver Rate Today : धनत्रयोदशीला सोने-चांदीत दरवाढ झाली होती. तरीही ग्राहकांनी बाजारपेठेत जोरदार खरेदी केली. गेल्यावर्षीचे सर्व रेकॉर्ड तोडले. त्यानंतर सोने-चांदीत घसरण झाली. भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीला ज्यांना खरेदी करणे जमले नाही. त्यांना कमी किंमतीत सोने-चांदी खरेदी करता आले. काय आहे सोने-चांदीचा भाव?

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची आनंदवार्ता, पुन्हा साधला स्वस्ताईचा मुहूर्त
| Updated on: Nov 12, 2023 | 8:27 AM
Share

नवी दिल्ली | 12 नोव्हेंबर 2023 : सध्या दिवाळीचा उत्साह ओसांडून वाहत आहे. आनंदाचे क्षण आहेत. पै-पाहुण्यांची गर्दी होत आहे. सराफा बाजारात पण गर्दी झाली आहे. धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या किंमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांनी खरेदीचा नवीन रेकॉर्ड केला. भावात मोठी वाढ झाली असतानाही भारतीय सराफा पेठा गजबजलेल्या होत्या. ग्राहकांनी गेल्यावर्षीचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर सोने-चांदीत नरमाई आली. भावात चांगलीच घसरण झाली. धनत्रयोदशीला ज्यांना सोने-चांदीची खरेदी (Gold Silver Price Today 12 November 2023) करता आली नाही. त्यांना शनिवारी स्वस्तात मौल्यवान धातूची खरेदी करता आली. अशी आली सोने-चांदीत स्वस्ताई…

सोने असे झाले स्वस्त

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात पण धनत्रयोदशी वगळता सोन्यात घसरण होती. 31 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली होती. 10 नोव्हेंबर रोजी सोन्यात 300 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी 450 रुपयांनी भाव उतरले. आता 22 कॅरेट सोने 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 1000 रुपयांची घसरण

या आठवड्यात 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 10 नोव्हेंबर रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. चांदीत 800 रुपयांची दरवाढ झाली. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,240 रुपये, 23 कॅरेट 59,999 रुपये, 22 कॅरेट सोने 55,180 रुपये झाले. 18 कॅरेट 45,180 रुपये, 14 कॅरेट सोने 35,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,416 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत