AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, असे आहेत भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वकालीन उच्चांक या वर्षाच्या अखेरीस नोंदवला. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड सोने-चांदीने मोडीत काढले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार दिवाळीपासून मौल्यवान धातूंनी उसळी घेतली आहे. या दरवाढीला किंचित ब्रेक लागला आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, असे आहेत भाव
| Updated on: Dec 01, 2023 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने गेल्या दोन दिवसांत इतिहास रचला. किंमती गगनाला भिडल्या. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याने मुसंडी मारली. सोने आणि चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहचले. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती. ही त्यावेळची सर्वाधिक किंमत होती. मंगळवारी आणि बुधवारी या मौल्यवान धातूंनी नवीन रेकॉर्ड केला. जुने सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. गळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. बुधवारी सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर (Gold Silver Price Today 1 December 2023) पोहचला. गुरुवारी या किंमतीत किंचित घसरण झाली.

सोने घसरले

दिवाळीपासून सोन्याने दरवाढीचा सूर आळवला आहे. या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले नाही तर नवीन विक्रम पण नावावर केला. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी चमकली

गेल्या दोन आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली आहे. .गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. काल भाव अपडेट झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यात किंचित घसरण झाली. 21-25 रुपयांनी किंमती घसरल्या. 24 कॅरेट सोने 62,607 रुपये, 23 कॅरेट 62,357 रुपये, 22 कॅरेट सोने 57,348 रुपये झाले. 18 कॅरेट 46,955 रुपये, 14 कॅरेट सोने 36,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,934रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...