AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 1 December 2024 : लग्नसराईत सोने-चांदी उसळी घेणार? की देणार मोठा दिलासा, काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 1 December 2024 : लग्नसराईत सोने आणि चांदी उसळी घेणार का? या आठवड्यात मौल्यवान धातुनी जोरदार फटकेबाजी केली. सुरुवातीला किंमती घसरल्या नंतर दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड केला. आता सराफा बाजारात अशा आहेत बेशकिंमती धातुच्या किंमती?

Gold Silver Rate Today 1 December 2024 : लग्नसराईत सोने-चांदी उसळी घेणार? की देणार मोठा दिलासा, काय आहेत आता किंमती?
सोने-चांदी किंमत
| Updated on: Dec 01, 2024 | 8:40 AM
Share

लग्नसराईच्या हंगामात सोने आणि चांदीने जोरदार बॅटिंग केली. सोन्याने पुन्हा 80 हजारांकडे झेप घेतली तर चांदीचा प्रवास 90 हजारांकडे सुरू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत मोठी घसरण झाली होती. ग्राहकांची या काळात सराफा बाजारात एकच झुंबड उडाली. बुधवारनंतर किंमती वधारल्या. तीन दिवसातच दोन्ही धातुनी मोठा पल्ला गाठला. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. नवीन वर्षात 20 जानेवारी रोजी ट्रम्प सत्तेवर येणार आहेत. तर अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाकडे पण लक्ष लागले आहे. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 1 December 2024 )

सोने 1 हजारांनी वधारले

या आठवड्याच्या सुरुवातीला 380 रुपयांनी सोने उतरले. तर आठवड्याच्या मध्यानंतर एक हजारांनी किंमती वधारल्या. 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजी 150 रुपयां घसरण झाली. तर 29 नोव्हेंबर रोजी सोन्याने 760 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,760 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची महागाईला फोडणी

गेल्या आठवड्यासह या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने नरमाईचा सूर आळवला. सोमवार आणि मंगळवारी मिळून 2500 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर दोन दिवसात किंमतीत बदल दिसला नाही. 29 नोव्हेंबर रोजी 2 हजारांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,740, 23 कॅरेट 76,433, 22 कॅरेट सोने 70,294 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,555 रुपये, 14 कॅरेट सोने 44,893 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,383 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...