AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : दणकावून आपटले भाव, चांदीने स्वस्ताईत सोन्यावर केली मात

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारात सोने-चांदीत घसरण सुरु आहे. एका महिन्याच्या निच्चांकी पातळीवर या किंमती आल्या आहेत. त्याचा भारतीय बाजारात परिणाम दिसून आला. चांदीने स्वस्ताईत सोन्यावर मात केली.

Gold Silver Rate Today : दणकावून आपटले भाव, चांदीने स्वस्ताईत सोन्यावर केली मात
| Updated on: Aug 11, 2023 | 9:32 AM
Share

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : सोने-चांदीने (Gold Silver Price Today) ऑगस्ट महिन्यात खरेदीदारांसाठी आनंदवार्ता आणली. ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात घसरणीचे सत्र सुरुच आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याला उसळी तर घेता आलीच नाही. उलट किंमतीत मोठी घसरण झाली. जुलै महिन्यानंतर पहिल्यांदा भाव 60,000 रुपयांच्या आत आले आहे. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीच्या किंमती घसरण झाली होती. सोन्याचा भाव 58,000 रुपयांच्या घरात आला होता. जुलै महिन्यात सोन्याला थोडी उभारी मिळाली. सोन्याच्या भावाने 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. पण ऑगस्ट महिन्यात सोन्याला मोठी झेप घेता आली नाही. चांदीने तर स्वस्ताईत सोन्यावर पण मात केली आहे. किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

निच्चांकी किंमती

जागतिक बाजारात सोने-चांदीत घसरण सुरु आहे. एका महिन्याच्या निच्चांकी पातळीवर या किंमती आल्या आहेत. डॉलरने जबरदस्त कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या गंगाजळीत ही मोठी आवक आली आहे. त्याचा परिणाम दिसून आला. चीनने सर्व लक्ष तांबे खरेदीवर केंद्रीत केले आहे. सप्टेंबर महिन्यात अमेरिकन केंद्रीय बँक व्याज दरात वाढ करणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदी पुन्हा दबावाखाली आले आहे.

ऑगस्ट महिन्यात इतकी झाली घसरण

ऑगस्ट महिन्यात सोन्यात घसरण सुरुच आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सोने 1000 रुपयांनी घसरले. या दिवसांत सोन्यामध्ये केवळ दोनदा वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली होती. तर 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते.

सोने पुन्हा स्वस्त

ऑगस्ट महिना सोने-चांदी खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी फायदाचा ठरला. दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली.गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. तर 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 250 रुपयांनी कमी झाले. 22 कॅरेट सोने 54,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीत 5300 रुपयांनी स्वस्त

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत चांदीत स्वस्ताई आली. चांदी 5300 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. मंगळवारी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. बुधवारी 500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.चार दिवसांत या किंमतीत 2100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,909 रुपये, 23 कॅरेट 58,673 रुपये, 22 कॅरेट सोने 53,961 रुपये, 18 कॅरेट 44,182 रुपये, 14 कॅरेट सोने 34,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,176 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?