AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावाला युद्धाचा तडका, Israel Hamas War मुळे दरवाढ

Gold Silver Rate Today : मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगात सर्वदूर अनेक वस्तूंच्या किंमती वधारल्या आहेत. सोने आणि चांदीवर तर या युद्धाचा लागलीच परिणाम दिसून आला. मध्य-पूर्व हा व्यापारासाठी महत्वाचा भाग आहे. त्याच भागात युद्ध भडकल्याने सध्या मौल्यवान धातूच्या किंमती भडकल्या आहेत. या दोन्ही धातूंनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावाला युद्धाचा तडका, Israel Hamas War मुळे दरवाढ
| Updated on: Oct 11, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास युद्धाने (Israel-Palestine Conflict) मध्य-पूर्वेतील परिस्थिती बिघडवली आहे. या प्रदेशातील अशांततेमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचा परिणाम दिसून येत आहे. व्यापारीदृष्टीने मध्यपूर्व हा महत्वाचा भाग आहे. गेल्या 19 महिन्यांपासून युक्रेन-रशिया युद्धाचे जग परिणाम भोगत असताना आता या नवीन युद्धाने अनेक वस्तूंच्या किंमती भडकण्याची भीती वाढली. आयातीवर अधिक अवलंबून असणाऱ्या देशांना त्याचा सर्वात फटका बसेल. देशातील अनेक बँकांनी दोन वर्षांपासून सोन्याचा त्यामुळेच साठा करण्यास सुरुवात केली आहे. सुस्तावलेल्या सोने-चांदीत (Gold Silver Rate Today 11 October 2023) या युद्धाने चैतन्य भरले आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उचल खाल्ली आहे. किंमती अशा भडकल्या आहेत.

सोन्याच्या किंमती भडकल्या

गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सोन्याने एकाएक आघाडी घेतली. इस्त्राईल-हमास युद्धाचा हा परिणाम होता. त्यादिवशी किंमतीत 70 रुपयांची वाढ झाली. शनिवारी 310 रुपये, 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची, 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी भाव वाढला. तर 10 ऑक्टोबर रोजी किंमती 330 रुपयांनी भडकल्या. या चार दिवासात 1,300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीची मोठी झेप

सप्टेंबर महिन्यात चांदीत मोठी पडझड झाली होती. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच घसरणीने झाली. पण 7 ऑक्टोबर रोजी चित्र पालटले. युद्धानंतर चांदी लकलकली. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,479 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,249 रुपये, 22 कॅरेट सोने 52651 रुपये, 18 कॅरेट 43,109 रुपये, 14 कॅरेट सोने 33,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 68,583 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.