AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 October 2024 : दसऱ्यालाच सोने-चांदीचे महागाईचे तोरण; मौल्यवान धातु एकदम सुसाट, खिसा खाली होणार बाजारात

Gold Silver Rate Today 12 October 2024 : या आठवड्यात सलग सुरू असलेल्या घसरणीला सोने आणि चांदीने ब्रेक लावला. दसऱ्यालाच दोन्ही धातुनी महागाईचे तोरण बांधले. या घडामोडीमुळे मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापल्या जाणार आहे.

Gold Silver Rate Today 12 October 2024 : दसऱ्यालाच सोने-चांदीचे महागाईचे तोरण; मौल्यवान धातु एकदम सुसाट, खिसा खाली होणार बाजारात
सोने आणि चांदी महाग
| Updated on: Oct 12, 2024 | 8:43 AM
Share

पितृपक्षापासून सोने आणि चांदीने मोठा पल्ला गाठला. दरवाढीचे विक्रम मोडीत काढले. त्यामुळे ऐन सणासुदीत मौल्यवान धातु मोठा फटका देतील हे स्पष्ट होते. तर या आठवड्यात सोमवारपासून सलग घसरण होत होती. सणासदापूर्वीच दोन्ही धातूत मोठी घसरण झाली. या घाडमोडींमुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीची योजना अनेकांनी आखली होती. पण त्यापूर्वीच दोन्ही धातुनी मोठी मुसंडी मारली. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. या घडामोडीमुळे मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापल्या जाणार आहे. आता अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 12 October 2024 )

या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा

मागील दोन आठवड्यात सोन्याने 2300 रुपयांची मुसंडी मारली. तर या आठवड्यात या धातुत जवळपास हजार रुपयांची घसरण झाली. 7 ऑक्टोबर रोजी 220 रुपये तर 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी भाव उतरला. 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. तर 11 ऑक्टोबर रोजी सोन्याने 760 रुपयांची उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात पण दरवाढीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2 हजारांनी वधारली

चांदीत 29 सप्टेंबरपासून मोठा बदल झाला नव्हता. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चांदीत 2 हजारांची वाढ झाली होती. या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. सोमवारी भाव जैसे थे होते. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी घसरली. तर 11 ऑक्टोबर रोजी चांदीने 2 हजारांची मुसंडी मारली. आज सकाळी सुद्धा चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,623, 23 कॅरेट 75,320, 22 कॅरेट सोने 69,271 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,717 रुपये, 14 कॅरेट सोने 44,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,963 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?