AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 September 2024 : सोने-चांदीची आगेकूच, किंमती वाढल्या झरझर, उत्सवात आता भाव काय?

Gold Silver Rate Today 12 September 2024 : सोने आणि चांदीच्या किंमतीत सणासुदीत जोरदार वाढ झाली. या आठवड्यात मरगळ झटकून दोन्ही धातूंनी भरारी घेतली आहे. उत्सवात मौल्यवान धातूंनी दरवाढीची नोंद केली. सणावाराच्या धामधुमीत दरवाढीचे सत्र सुरू राहणार का?

Gold Silver Rate Today 12 September 2024 : सोने-चांदीची आगेकूच, किंमती वाढल्या झरझर, उत्सवात आता भाव काय?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Sep 12, 2024 | 8:31 AM
Share

सध्या सणासुदीची धामधूम सुरू आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींनी उंच उडी घेतली आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. गेल्या काही आठवड्यापासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरू होते. बजेटमध्ये सीमा शुल्कात कपात झाल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. ऑगस्टच्या सुरूवातीला दोन्ही धातूच्या किंमती भडकल्या. त्यानंतर त्यात नरमाई आली. गेल्या दोन आठवड्यात किंमती उतरल्या होत्या. या आठवड्यात मरगळ झटकून दोन्ही धातूंनी भरारी घेतली आहे. उत्सवात मौल्यवान धातूंनी दरवाढीची नोंद केली. असा आहे आता सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 12 September 2024 )

सोन्याची सुरुवातीलाच घौडदौड

गेल्या काही दिवसांची मरगळ झटकून सणासुदीत सोन्याने मोठा टप्पा गाठला. सोमवारी सोन्याचा दर स्थिर होता. तर 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. त्यानंतर बुधवारी सोने 380 रुपयांनी वधारले. तर आज 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दमदार कामगिरी

मरगळ झडत चांदीने या आठवड्यात दमदार कामगिरी केली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वधारली. 10 सप्टेंबरला 1 हजारांची वाढ झाली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर सकाळच्या सत्रात 12 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,994, 23 कॅरेट 71706, 22 कॅरेट सोने 65,947 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,996 रुपये, 14 कॅरेट सोने 42,117 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,407 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा