AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीची सुवर्णसंधी, ग्राहकांची होईल चांदी! काय आहे सोने-चांदीचा भाव

Gold Silver Rate Today : ग्राहकांना सोने-चांदीची मोठी संधी आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंना विशेष कामगिरी बजावता आली नाही. जुलै महिन्यात काही प्रमाणात उसळी घेतलेल्या सोन्याला ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत मोठी झेप घेता आली नाही. चांदीने माघार घेतली आहे.

Gold Silver Rate Today : खरेदीची सुवर्णसंधी, ग्राहकांची होईल चांदी! काय आहे सोने-चांदीचा भाव
| Updated on: Aug 13, 2023 | 9:19 AM
Share

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : मे आणि जून महिन्यात सोने-चांदीला (Gold Silver Price Today) मोठी उडी घेता आली नाही. सोने 58,000 रुपयांच्या घरात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात सोन्याने जवळपास 2000 रुपयांची आगेकूच केली. चांदीने पण घौडदौड केली. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदी आणखी पुढचा टप्पा गाठतील असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज होता. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर मात्र तीन महिन्यात दोन्ही धातूंना कोणताही नवीन विक्रम करता आलेला नाही. यामहिन्याची सुरुवात दरवाढीने झाली. पण पुढील दहा दिवसांत पडझडीचेच सत्र सुरु आहे. आता तर भावात अजून नरमाई आली आहे. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

सोन्याला पल्ला गाठता येईना

ऑगस्ट महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये सोने 1000 रुपयांनी स्वस्त झाले. या काळात सोन्यात फक्त दोनदा वाढ झाली. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली होती. तर 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते. तर 8,9,10,11 ऑगस्ट या चार दिवसांत सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली. 12 ऑगस्ट रोजी भावात किंचित सुधारणा झाली.

सोन्याच्या स्वस्ताईची कथा

  1. 1 ऑगस्ट रोजी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली.
  2. 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली.
  3. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या.
  4. 4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
  5. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले.
  6. या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही.
  7. 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली.
  8. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली.
  9. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 250 रुपयांनी कमी झाले.
  10. 11 ऑगस्ट रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले.
  11. 22 कॅरेट सोने 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम
  12. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
  13. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदी 5300 रुपयांची घसरण

ऑगस्ट महिन्यात चांदीने स्वस्ताईचा षटकार हाणला. चांदी 5300 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी चांदी घसरली. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी उतरली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. चार दिवसांत या किंमतीत 2100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,909 रुपये, 23 कॅरेट 58,673 रुपये, 22 कॅरेट सोने 53,961 रुपये, 18 कॅरेट 44,182 रुपये, 14 कॅरेट सोने 34,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,176 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?