AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 13 February 2025 : दरवाढीच्या तुफानानंतर सोने-चांदीची विश्रांती, किंमतीत मोठी पडझड

Gold Silver Rate Today 13 February 2025 : अखेर सोने आणि चांदीच्या घोडदौडीला ब्रेक लागला. गेल्या दोन आठवड्यात मौल्यवान धातुने विक्रमी धाव घेतली. ट्रम्प कार्डमुळे दोन्ही धातुच्या किंमतीत तुफान आले. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 13 February 2025 : दरवाढीच्या तुफानानंतर सोने-चांदीची विश्रांती, किंमतीत मोठी पडझड
सोने आणि चांदीचा ग्राहकांना दिलासा
| Updated on: Feb 13, 2025 | 8:30 AM
Share

सोने चांदीने पुन्हा विक्रमाला गवसणी घातली. दोन्ही धातुच्या किंमतीत तुफान आले. ग्राहकांची बोबडी वळली. सराफा बाजार अनेकांसाठी केवळ पर्यटन, दुरून दर्शन झाला. तर काहींनी असलेला धातु मोडीत काढण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. लग्न सराई असल्याने वधू-वराकडील मंडळी सुद्धा काळजीने दोन्ही धातुची खरेदी करत आहेत. तर ज्यांच्याकडे पैसा आहेत. त्यांनी खरेदी सुरू केली आहे. पण आता सोन्यात आपटी बार आला आहे. तर चांदी गेल्या सहा दिवसांपासून नरमली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशा आहेत किंमती…(Gold Silver Price Today 13 February 2025 )

सोन्याच्या घोडदौडीला ब्रेक

गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले. तर 440 रुपयांनी उतरले होते. तर या आठवड्यात सोमवारी सोने 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी महागले होते. तर बुधवारी सोने 710 रुपयांनी आपटले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत नाही बदल

गेल्या 5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते 12 तारखेपर्यंत चांदीत कोणताही बदल झालेला नाही. किंमतीत मोठा बदल दिसलेला नाही. चांदी तशी लाखाच्या उंबरठ्यावर आहे.या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 84,845, 23 कॅरेट 84,505, 22 कॅरेट सोने 77,718 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,634 रुपये, 14 कॅरेट सोने 49,634 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,189 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...