AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 January 2025 : महागाईचा पतंग आकाशी, दणक्यात वधारले सोने-चांदी, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 14 January 2025 : या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातुने जोरदार मुसंडी मारली. सोने-चांदीचा महागाईचा पतंग आकाशी गेला आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या, लगेच चेक करा. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 14 January 2025 : महागाईचा पतंग आकाशी, दणक्यात वधारले सोने-चांदी, काय आहेत किंमती?
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Jan 14, 2025 | 8:34 AM
Share

नवीन वर्षात सोने आणि चांदीने महागाईची तुतारी फुंकली आहे. गेल्या दोन आठवड्यात मौल्यवान धातुनी ब्रेक घेतला असला तरी किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या काळात सोने 2500 रुपयांनी तर चांदी तीन हजारांच्या घरात महागली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुनी सिक्सर लगावला होता. तर या सोमवारी बेशकिंमती धातुत मोठी वाढ दिसली. मकर संक्रांतीलाच ग्राहकांच्या खिशावर या दरवाढीमुळे संक्रांत आली. दर आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात जीएसटी कमी झाला तर किंमती कमी होतील. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 14 January 2025 )

सोन्याचा पतंग आकाशी

गेल्या 13 दिवसांत सोने 2500 रुपयांनी महागले तर गेल्या आठवड्याच्या अखेरीस बेशकिंमती धातुत 650 रुपयांची वाढ झाली. या सोमवारी सोने 420 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची गगन भरारी

13 दिवसात चांदी 3 हजारांनी महागली. तर गेल्या आठवड्यात चांदी दोन हजारांनी वधारली. सोमवारी चांदी 1 हजारांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,308, 23 कॅरेट 77,994 22 कॅरेट सोने 71,730 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,731रुपये, 14 कॅरेट सोने 45,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,800 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?