AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 September 2024 : चांदीने कहर केला, सोन्याची दमदार उडी, काय आहेत आता भाव तरी?

Gold Silver Rate Today 14 September 2024 : सोने आणि चांदीने आठवड्याच्या अखेरच्या सत्रात तुफान फटकेबाजी केली. चांदीने तर 3 हजार रुपयांची उसळी घेतली. सोन्यामध्ये पण मोठी घडामोड घडली आहे. आता या दोन्ही मौल्यवान धातूंची अशी आहे किंमत...

Gold Silver Rate Today 14 September 2024 : चांदीने कहर केला, सोन्याची दमदार उडी, काय आहेत आता भाव तरी?
सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Sep 14, 2024 | 8:36 AM
Share

या आठवड्यात मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठा चढउतार दिसला. प्रत्येक दिवशी सकाळ-दुपार किंमतीत मोठा बदल दिसला. गणपती बाप्पाचे आगमन, महालक्ष्मी आगमनामुळे बाजारपेठेत एक चैतन्य पसरले आहे. या काळात मौल्यवान धातूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील भावात मोठा तफावत दिसली. काल चांदीने 3 हजारांची उसळी घेतली तर सोन्यात पण मोठी वाढ झाली. आता अशा आहेत या दोन मौल्यवान धातू्च्या किंमती? (Gold Silver Price Today 14 September 2024 )

सोन्याची दमदार बॅटिंग

सणासुदीत सोने चांगलेच चमकले. सोन्यात मोठी दरवाढ दिसली. सुरुवातील 10 सप्टेंबर रोजी किंमती 440 रुपयांनी स्वस्त झाल्या. 11 सप्टेंबरला त्यात 380 रुपयांची वाढ झाली. 12 सप्टेंबर रोजी किंचित घसरण झाली. 13 सप्टेंबर रोजी किंमतीत 130 रुपयांची भर पडली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 5 हजारांनी वाढली

या आठवड्यात चांदी 5 हजारांनी महागली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी, 10 सप्टेंबरला 1 हजारांनी तर 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. 12 सप्टेंबर रोजी भावात बदल दिसला नाही. 13 सप्टेंबर रोजी 3,000 रुपयांनी चांदी महागली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?