AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 15 February 2025 : चांदी लाखावर, सोन्याची कमाल, किंमती सुसाट, ग्राहकांना मोठा फटका

Gold Silver Rate Today 15 February 2025 : सोन्याने दोन आठवड्यात मोठी मजल मारली तर दुसरीकडे चांदीने विश्रांतीनंतर मुसंडी मारली. चांदीने लाखाचा टप्पा पार केला. दोन्ही धातुतील दरवाढीने ग्राहकांना घाम फोडला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 15 February 2025 : चांदी लाखावर, सोन्याची कमाल, किंमती सुसाट, ग्राहकांना मोठा फटका
सोने-चांदीची कमाल
| Updated on: Feb 15, 2025 | 8:29 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत दिलखुलास गळाभेट झाली. पण व्यापारी धोरणाबाबत ट्रम्पची धोरण भारतासाठीच नाही तर जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सोन्याने दोन आठवड्यात मोठी मजल मारली. तर चांदीने सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसंडी मारली. दोन्ही धातुच्या या आठवड्या अखेरच्या फटकेबाजीने ग्राहकांना झटका बसला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशा आहेत किंमती…(Gold Silver Price Today 15 February 2025 )

सोन्याची 1200 रुपयांची मजल

गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले. तर त्यात 400 रुपयांची पडझड दिसली. या आठवड्यात सोने जवळपास 1200 रुपयांनी वधारले. तर त्यात 700 रुपयांची घसरण दिसली. सोमवारी 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी सोने वधारले. बुधवारी 710 रुपयांची स्वस्ताई आली. गुरुवारी 400 रुपयांनी किमत वधारली. शुक्रवारी त्यात किरकोळ 100 रुपयांची वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा

5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते 14 तारखेपर्यंत चांदीत कोणताही बदल नव्हता. तर व्हॅलेंटाईन डे रोजी चांदीने हजारांचा टप्पा ओलांडला. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,998, 23 कॅरेट 85,654, 22 कॅरेट सोने 78,774रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,499 रुपये, 14 कॅरेट सोने 50,309 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,953 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास