AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 15 March 2025 : महागाईची भांग उतरेना! सोने आणि चांदी सुसाट, ग्राहकांचा खिसा कापला

Gold Silver Rate Today 15 March 2025 : सोने आणि चांदीची महागाईची भांग उतरली नाही. महागाईचा आलेख उंचावला आहे. सोने-चांदीत तुफान उसळी दिसून आली. दोन्ही धातुनी धुळवड साजरी केली. तीन दिवसात महागाईचे रंग उधळले आहेत. 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 15 March 2025 : महागाईची भांग उतरेना! सोने आणि चांदी सुसाट, ग्राहकांचा खिसा कापला
सोने आणि चांदीची किंमतImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 15, 2025 | 8:34 AM
Share

सोने आणि चांदीची महागाईची भांग कायम असल्याचे दिसले. दोन्ही धातुत तुफान उसळी दिसून आली. महागाईचा आलेख उंचावला आहे. सोने आणि चांदीत तुफान उसळी दिसून आली. सोने आता 90 हजारांच्या टप्प्यात आले आहे. तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ऐन रंगोत्सवातच दोन्ही धातुनी ग्राहकांना उन्हापेक्षा अधिक घाम फोडला आहे. तीन दिवसात दोन्ही धातुनी महागाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 15 March 2025 )

सोन्याची भांग उतरेना

या आठवड्यात सोन्याने मोठी मुसंडी मारली. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोन्याने 1200 रुपयांचा टप्पा गाठला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखांच्या पार

चांदीने गेल्या दोन आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सुरुवातीला चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर बुधवारी 2 हजार, गुरूवारी 1 हजार तर शुक्रवारी 2 हजारांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे...
शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस! रूपम घुगे यांची मोठी घोषणा
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?