AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo Rate Cut : पुन्हा आनंदवार्ता, रेपो रेटमध्ये कपातीचे संकेत, गृहकर्जाचा हप्ता होणार स्वस्त?

RBI Repo Rate Cut News : आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक होत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात ही बैठक होईल. पण त्यापूर्वीच एक मोठा आनंदवार्ता समोर येत आहे.

Repo Rate Cut : पुन्हा आनंदवार्ता, रेपो रेटमध्ये कपातीचे संकेत, गृहकर्जाचा हप्ता होणार स्वस्त?
आरबीआय रेपो रेट Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2025 | 2:52 PM
Share

Interest Rate Cut : एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. केंद्र सरकारने कालच किरकोळ महागाईचा आलेख जाहीर केला आहे. त्यानुसार महागाई दर 4 टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे. सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केल्यानंतर आनंदाची लहर आहे. या सांगाव्यामुळे पतधोरण समिती पुन्हा रेपो दरात कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महागाई झाली कमी

12 मार्च रोजी सांख्यिकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या किरकोळ महागाईच्या आकड्यांनी सर्वसामान्यांनाच नाही तर सरकारला सुद्धा दिलासा दिला. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर घसरून 3.61 टक्क्यांवर आला आहे. जानेवारी महिन्यात हा आकडा 4.3 टक्क्यांवर पोहचला होता. सरकार मार्च महिन्यात सुद्धा किरकोळ महागाईचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

एप्रिलमध्ये पतधोरण समितीची बैठक

एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात 7-9 एप्रिलपर्यंत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक होत आहे. या बैठकीत पुन्हा एकदा व्याज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी मल्होत्रा हे गव्हर्नर झाल्यानंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 25 अंकांची कपात झाली. रेपो रेट 6.50 टक्क्यांहून 6.25 टक्क्यांपर्यंत घसरला. एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष 2025-26 सुरू होत आहे. मार्च महिन्यात पण किरकोळ महागाई दर कमी राहिल्यास रेपो दरात कपातीचे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारीची प्रेमळ वार्ता

फेब्रुवारी महिन्यात खाद्य महागाई दरात मोठी घसरण दिसली. फेब्रुवारी महिन्यात खाद्य महागाई दर घसरून 3.75 टक्क्यांपर्यंत खाली आला. जानेवारी महिन्यात हा आकडा 5.97 टक्के इतका होता. भाजीपाल्याच्या किंमती घसरल्याने आरबीआयला पतधोरण राबवताना रेपो दरात कपातीचा विचारा करावा लागणार आहे. जर या महिन्यात धान्याच्या किंमती उतरल्या आणि खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्या तर मार्च महिन्यातील आकडेवारी सुद्धा दिलासा देऊ शकते. त्यामुळे रेपो दरात पडझड दिसू शकते. येत्या काही दिवसात महागाईचे आकडे घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक भागात रब्बीचे जोरदार उत्पादन झाल्याने हा आलेख खाली आल्याचा दावा करण्यात येत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.