दारूच्या घोटापूर्वी जमिनीवर ती का शिंपडतात? काय आहे शास्त्र, काय बुवा तंत्र? अट्टल दारुड्याला पण नाही माहिती, ज्योतिषाचा दावा काय?
Alcohol Tips : तुम्ही अनेक लोक मद्यपान करताना पाहिले असेल. त्यावेळी ते दारू पोटात रिचवण्यापूर्वी ग्लासमध्ये बोट बुडवून जमिनीवर थेंब शिंपडतात. यामागे काय कारण असेल? अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही, पण त्याविषयीचे कुतुहल कायम आहे.

होळीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. रंगासह भांग हा अनेकांचा आवडता विषय असतो. काही जण शेतात, वसतीवर खास होळी करतात. त्यांचे आवडते पेय, आवडते खाद्य पदार्थ, गाणे, मित्र असा त्यांचा माहौल असतो. पण त्यातच एक प्रश्न कुतुहलापोटी सारखा समोर येतो. तो म्हणजे दारुडे जेव्हा दारु पितात. तेव्हा ते ग्लासमधील दारूत बोट बुडवतात आणि तिचे थेंब जमिनीवर शिंपडतात. त्यामागे काय कारण असेल?
अर्थातच या प्रश्नाच्या उत्तराने जगाच्या समस्या सुटणार नाहीत. पण अशी कृती ते का करतात, हा मुद्दा बाकी उरतोच की? म्हणून त्यासाठी इंटरनेटवर धांडोळा घेतल्यावर तर हे शास्त्र आणि तंत्र असल्याचे समोर आले. कारण त्यातील अनेक दारूडे हे अनामिका हे बोट ग्लासमध्ये बुडवतात आणि दारुचे काही थेंब हे जमिनीवर सांडतात असे समोर आले. पण ते असे का करतात, हे त्यांना सुद्धा माहिती नाही, कोणी तरी केले, एकाने केले मग दुसर्याने केले. मग हा सवयीचा भाग झाला असे ते म्हणतात. पण प्रश्न उरतोच की ते असे का करतात?




ज्योतिष शास्त्रात दडलंय रहस्य
सोशल मीडियावर स्वतःला ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने याविषयीचा खुलासा केला आहे. अनुराग ठाकुर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने मद्यपी दारुचे थेंब जमिनीवर का सांडतात, शिंपडतात याविषयीचा एक तर्क दिला आहे. त्यानुसार, ज्योतिष शास्त्रात याविषयी एका तर्क दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. असे केल्याने जीवनातील शनिचा प्रभाव कमी होत असल्याचा दावा या अनुराग ठाकुर नामक व्यक्तीने केला आहे.
View this post on Instagram
काहीच कमी नाही पडत
तर या ठाकुर नावाच्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे तंत्र वापरल्या जाते. दारु पिण्याअगोदर, तिचे काही थेंब जमिनीवर शिंपडल्यास तुमचे नशीब बदलून जाते. तुमचे अनामिका हे बोट दारूत बुडवल्यावर आणि त्याला लागलेले दारूचे थेंब जमिनीवर शिंपडल्यावर लोकांचे आयुष्य प्रभावित करणारा शनि शांत होतो. मद्यपींच्या जीवनात चांगल्या घटना घडतात. अनेक मद्यपी दारूच्या पहिल्या घोटापूर्वी असे करताना अनेक ठिकाणी दिसतात. पण त्यांना यामागील ही गोष्ट काही माहिती नसते. रतीब पडल्याप्रमाणे ते असे करतात.
अर्थातच दारूमुळे अनेकांचे संसार बुडाले आहेत. अनेकांची आयुष्य संपली आहेत. दारूच्या आहारी गेल्यामुळे नातेसंबंधात वितुष्ट आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर या ड्रिंक्सचा सोशल ड्रिंक म्हणून वापर करून डिल्स पूर्ण करण्याचे पण प्रचलन आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)