AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या छोटुरामने ओलांडला 900 रुपयांचा टप्पा; 1 लाखांचे केले 3.32 कोटी

Multibagger Stock : गेल्या 22 वर्षात हा पेनी शेअर तुफान धावला. 2.37 रुपयांहून हा शेअर 307 रुपयांपर्यंत पोहचला. तर एकाच वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी वधारला. त्यानंतर त्यात 11 टक्क्यांची घसरण पण नोंदवण्यात आली.

या छोटुरामने ओलांडला 900 रुपयांचा टप्पा; 1 लाखांचे केले 3.32 कोटी
शेअर नव्हे नोटा छापण्याचे मशीन Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2025 | 12:19 PM
Share

Multibagger Penny Stock : शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहेत. या पेनी स्टॉकने मोठा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 22 वर्षात हा पेनी शेअर तुफान धावला. 2.37 रुपयांहून हा शेअर 307 रुपयांपर्यंत पोहचला. तर एकाच वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी वधारला. त्यानंतर त्यात 11 टक्क्यांची घसरण पण नोंदवण्यात आली. एका चांगल्या मल्टिबॅगर स्टॉकची निवड करून त्यात रक्कम गुंतवल्यास, गुंतवणूकदारांना कित्येक पट्टीने रिटर्न मिळतो. त्यांचे चांगभलं होतं.

जिंदल स्टील अँड पॉवर

तर जिंदल स्टील अँड पॉवर (Jindal Steel And Power Ltd) या शेअरने रॉकेट भरारी घेतली आहे.गेल्या 22 वर्षात हा पेनी शेअर तुफान धावला. 2.37 रुपयांहून हा शेअर 307 रुपयांपर्यंत पोहचला आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी गेल्या 22 वर्षांत पैसे छापण्याची मशीन ठरला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

3.32 कोटी रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 3.32 कोटी रुपये असते. गुंतवणूकदारांना कित्येक पट्टीने फायदा झाला असता. त्यांच्या एक लाखांचे तीन कोटींहून अधिक रक्कम झाली असती. जिंदल स्टील अँड पॉवर या शेअरने ही कमाल करुन दाखवली आहे.

हा शेअर पैसे छापण्याची मशीन

गुरुवारी व्यापारी सत्रा दरम्यान कंपनीचा शेअर लाल रंगात न्हाऊन निघाला. काल पण या शेअरमध्ये घसरण दिसली. आज कंपनीच्या शेअरमध्ये 5.55 अंकांची घसरण दिसली. काल हा शेअर 901.05 रुपयांवर बंद झाला होता. तर आज हा शेअर 897.40 रुपयांवर आला. गेल्या पाच वर्षात हा शेअर 639.29 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे.

शेअर 12 टक्क्यांनी वधारला

गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी घसरला. सहा महिन्यांपासून या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. एका महिन्यात हा शेअर 8.22 टक्क्यांनी उसळला. YTD आधारानुसार स्टॉकमध्ये 4.33 टक्क्यांची घसरण आली. त्यानंतर आजही या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. आर्थिक वर्ष 2025 मधील तिसऱ्या तिमाहीत स्टील विक्रीत 5 टक्क्यांची वाढ दिसली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.