Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीची आनंदवार्ता! 2 रुपयांनी स्वस्त झाले डिझेल, असे आहेत पेट्रोलचे दाम

Petrol Diesel Price : देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव फलक अनेक दिवसानंतर हलला. होळीच्या पार्श्वभूमीवर आनंदवार्ता येऊन धडकली. देशातील काही शहरात सुद्धा दर घसरले. डिझेल दोन रुपयांनी उतरले तर दुसरीकडे पेट्रोलचा भाव आता असा आहे.

होळीची आनंदवार्ता! 2 रुपयांनी स्वस्त झाले डिझेल, असे आहेत पेट्रोलचे दाम
पेट्रोल आणि डिझेलची किंमतImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 9:47 AM

एक दिवसापूर्वीच केंद्र सरकारने देशातील महागाईचा आलेख जाहीर केला. त्यानुसार देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्क्यांहून खाली उतरला. तर होळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसत आहे. मुंबईतील ग्राहकांसाठी ही आनंदवार्ता आहे. इतर महानगरात मात्र इंधनाच्या किंमतीत वाढ दिसून आली. दिल्ली ते चेन्नईपर्यंत सर्वच शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 पैसे ते 1 रुपये प्रति लिटरपर्यंत दरवाढ दिसून आली. सर्वाधिक वाढ ही कोलकत्ता शहरात दिसून आली. तर देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसली.

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किरकोळ घसरण दिसली. आखाती देशात कच्चा तेल्याच्या किंमती 70 डॉलरच्या जवळपास आहे. तर दुसरीकडे अमेरिकन ऑईलच्या किंमतीत 67 डॉलर प्रति बॅरलहून अधिक पोहचल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

मुंबईत स्वस्त, इतर महानगरात महाग

हे सुद्धा वाचा

देशातील चार महानगरांपैकी मुंबई वगळता इतर शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ दिसून आली. नवी दिल्ली आणि चेन्नई या महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 पैशांची वाढ दिसून आली. दिल्लीत पेट्रोलचा भाव आता 94.77 रुपए प्रति लिटर तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 92.39 रुपये प्रति लिटर होईल.

कोलकत्तामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत सर्वाधिक एक रुपये प्रति लिटर वाढ दिसून आली. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत 1.07 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली. ही किंमत 105.01 रुपये प्रति लिटर इतकी झाली. डिझेलची किंमत 1.06 रुपये प्रति लिटरने वाढली. हा भाव आता 91.82 रुपये प्रति लिटर झाला आहे .

तर मुंबई, आर्थिक राजधानीतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या आकड्यांनुसार, मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 44 पैसे प्रति लिटरची कपात दिसली. तर किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झाली आहे. त्यानंतर डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाले.

कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण

कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकड्यांनुसार, आखाती देशात कच्चे तेल ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 0.14 पैशांची घसरण दिसली. कच्चे तेल 70.85 रुपये प्रति बॅरलवर पोहचले आहे. गेल्या दोन महिन्यात कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास 14 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर अमेरिकन कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित घसरण दिसली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.