AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 15 May 2024 : सोने उतरले तर चांदीने मारली मुसंडी, काय आहेत मौल्यवान धातूच्या आता किंमती

Gold Silver Rate Today 15 May 2024 : सलग दुसऱ्या दिवशी सोन्यात घसरण सुरु आहे. गेल्या आठवड्यातही सुरुवातीचे दोन दिवस सोने-चांदीत घसरण होती. सोने घसरले असले तरी चांदीने दरवाढ सुरुच ठेवली आहे. अशा आहेत मौल्यवान धातूची किंमत

Gold Silver Rate Today 15 May 2024 : सोने उतरले तर चांदीने मारली मुसंडी, काय आहेत मौल्यवान धातूच्या आता किंमती
सोने नरमले, चांदी वधारली
| Updated on: May 15, 2024 | 8:34 AM
Share

मे महिन्यात अजून सोने आणि चांदीला मोठी मुसंडी मारता आलेली नाही. मार्च आणि एप्रिल महिन्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीचा कहर केला होता. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. या बदलामुळे सोने थेट 70 हजारांच्या पुढे सरकले आहे. 9 वर्षांत भाव तिप्पट होण्याचा पॅटर्न सोन्याने कायम ठेवला आहे. या आठवड्यात सलग दोन दिवस सोने स्वस्त झाले आहे. तर चांदीने नरमाईनंतर पुन्हा उसळी घेतली. सोने आणि चांदीची असा आहे भाव (Gold Silver Price Today 15 May 2024 )

सोने 500 रुपयांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात सोने 2050 रुपयांनी वधारले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने स्वस्ताईची वार्ता दिली. 13 मे रोजी सोन्याची किंमत 100 रुपयांनी कमी झाली. तर 14 मे रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रातही सोने उतरणीवर दिसत असले तरी दुपारनंतर किंमती समोर येतील. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत झाली घसरण

गेल्या आठवड्यात चांदीने 4700 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली होती. 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली. तर 14 मे रोजी चांदीने 700 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,335 रुपये, 23 कॅरेट 72,045 रुपये, 22 कॅरेट सोने 66,259 रुपये झाले. 18 कॅरेट 54,251 रुपये, 14 कॅरेट सोने 42,316 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 84,080 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?