AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: ते फक्त सत्तेचे दलाल… नमक हराम… अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात रोहित पवारांचा मोठा संताप… कुणावर धडाधड बॉम्ब

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता त्यांनी पुन्हा धडाधड आरोप केले आहेत.

Rohit Pawar: ते फक्त सत्तेचे दलाल... नमक हराम... अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात रोहित पवारांचा मोठा संताप... कुणावर धडाधड बॉम्ब
रोहित पवार, अजितदादा पवार, विमान अपघातImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 11, 2026 | 12:56 PM
Share

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांना बारामती येथे विमान अपघातात काळाने हिरावले. त्यांचा विमान अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेऊन विमान अपघातावर प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले. आता त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेचा संदर्भ देत काही जणांवर मोठा संताप व्यक्त केला आहे.

ते फक्त सत्तेचे दलाल

रोहित पवार यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहेत. त्यात त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भ देत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी मोठा सवाल उपस्थित केला आहे. “अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत, असा संताप आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

सीआयडी तपासावर नाराजी

रोहित पवार यांनी याप्रकरणात सीआयडी तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. ते दोनदा पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयातही गेले आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक कॅप्टन व्ही. के. सिंग याला सीआयडीने व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पवार यांनी केला होता. तर याप्रकरणात सीआयडीच्या संथ तपासावरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. याप्रकरणात रोहित पवार हे सातत्याने सवाल करत आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेते याप्रकरणी सवाल विचारत नसल्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले आहे. आता त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भ देत एएआयबीच्या भूलथापांना बळी न पडण्याचे संकेत दिले आहेत. तर अहवालाची वाट पाहणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...