AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने स्वस्त, चांदी झाली महाग, काय आहे भाव

Gold Silver Rate Today : सोन्याने बाजारात माघार घेतली. सोने बाजारात स्वस्त झाले. तर चांदी महागली. चांदीने आगेकूच सुरुच ठेवली. त्यामुळे बाजारात ग्राहकांना दिलासा मिळाला. त्यांना स्वस्तात सोने खरेदी करता आली. चांदीत गेल्या तीन दिवसांत जवळपास 2800 रुपयांची दरवाढ झाली आहे. चांदी चमकल्याने काही गुंतवणूकदारांना आनंद झाला.

Gold Silver Rate Today : सोने स्वस्त, चांदी झाली महाग, काय आहे भाव
| Updated on: Nov 17, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : सराफा बाजारात सोन्यात स्वस्ताई आली तर चांदी महागली. ऑक्टोबर महिन्यानंतर मौल्यवान धातूमध्ये चढउताराचे सत्र आहे. या महिन्यात या मौल्यवान धातूंनी कमाल कामगिरी केली नाही. एका विशिष्ट किंमतीत दोन्ही धातूत चढउतार होत आहे. पण गेल्या दिवाळीपेक्षा या दिवाळीत किंमतीत वाढ झाली आहे. ज्यांनी गेल्यावर्षी गुंतवणूक केली. त्यांना या दिवाळीत चांगला परतावा मिळाला. सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. तर चांदीने दरवाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात सोने-चांदीत (Gold Silver Price Today 17 November 2023) पडझडीचे सत्र होते. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी चढाई केली. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती…

सोने झाले स्वस्त

नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीत मोठी दरवाढ झाली नाही. ऑक्टोबरच्या तुलनेत भावाने मोठी उसळी घेतली नाही. या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2800 रुपयांनी महागली

सोन्याने माघार घेतली असली तरी चांदी महाग झाली. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ दिसली.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोने 60,505 रुपये, 23 कॅरेट 60,263 रुपये, 22 कॅरेट सोने 55,423 रुपये झाले. 18 कॅरेट 45,379 रुपये, 14 कॅरेट सोने 35,395 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,855 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना