AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | खरेदीच्या उत्साहाला बाजाराचे बळ! सोने आणि चांदीच्या किंमती उतरल्या झरझर

Gold Silver Rate Today 19 March 2024 | गेल्या आठवड्यात सोन्याला मोठी भरारी घेता आली नाही. तर चांदीत दणआपट दिसली. चांदीच्या किंमतीत चढउतार दिसून आला. सोन्यात एकदाच मोठी उसळी दिसली. या आठवड्यात ही सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सराफा बाजारात काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today | खरेदीच्या उत्साहाला बाजाराचे बळ! सोने आणि चांदीच्या किंमती उतरल्या झरझर
| Updated on: Mar 19, 2024 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली | 19 March 2024 : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला होता. या आठवड्याची सुरुवात पण चांगली ठरली. मौल्यवान धातूंनी ग्राहकांसाठी आनंदवार्ता आणली. दोन्ही धातूच्या किंमतीत घसरण दिसून आली. 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी घौडदौड केली. पण त्यानंतर दोन्ही धातूंना मोठी मजल मारता आली नाही. गेल्या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला पण या धातूंच्या किंमतीत घसरण दिसून आली. सोने आणि चांदीचा काय आहे भाव (Gold Silver Price Today 19 March 2024) जाणून घ्या..

  1. सोन्याने दिली आनंदवार्ता – मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी महागले. तर त्यानंतरच्या या 9 दिवसांत सोने एकदाच 14 मार्च रोजी 250 रुपयांनी महागले. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल झाला नाही. उर्वरीत दिवसांत सोने 620 रुपयांनी घसरले. या सोमवारी, 18 मार्च रोजी सोन्यात 210 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,530 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीत दणआपट – मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी वधारली. तर गेल्या आठवड्यात चांदीमध्ये मोठा उलटफेर दिसून आला. चांदीत 12 मार्च रोजी 500 रुपये, 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपये तर 16 मार्च रोजी 300 रुपयांची वाढ झाली. तर 13 मार्च रोजी 900 रुपयांची तर या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 65,612 रुपये, 23 कॅरेट 65,350 रुपये, 22 कॅरेट सोने 60,100 रुपये झाले.18 कॅरेट 49,209 रुपये, 14 कॅरेट सोने 38,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,156 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट