AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 October 2024 : सणासुदीत सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; चांदी पण सुसाट, भाव तरी काय?

Gold Silver Rate Today 19 October 2024 : या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले. दोनही धातुनी जोरदार मुसंडी मारली. दिवाळीला लक्ष्मी पुजनासाठी मौल्यवान धातुच्या खरेदीचा विचार करत असाल तर गाठीशी जास्त पैसा ठेवा. कारण तोपर्यंत दोन्ही धातु महागण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today 19 October 2024 : सणासुदीत सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; चांदी पण सुसाट, भाव तरी काय?
सोने
| Updated on: Oct 19, 2024 | 8:33 AM
Share

दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातुनी चमत्कार दाखवला. सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले. तर चांदीने मोठी मुसंडी मारली. दिवाळीला लक्ष्मी पुजनासाठी खरेदीचा बेत आखत असाल तर आता गाठीशी जास्त पैसा ठेवा. कारण तोपर्यंत दोन्ही धातु अधिक महागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोने दिवाळीत 80 हजारांचा टप्पा गाठेल असा अंदाज होता. तर आता हा आकडा 85,000 रुपयांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेनुसार किंमतीत चढउतार दिसतात. त्यात जीएसटी रक्कम गृहीत धरल्यास यया सणासुदीला ग्राहकांचा मोठा खिसा कापल्या जाणार असल्याचे स्पष्ट होते. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 19 October 2024 )

सोन्याची तुफान बॅटिंग

सोन्याने या आठवड्याची सुरुवात पडझडीने केली. 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. 17 सप्टेंबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर 18 ऑक्टोबर रोजी सोन्याने 870 रुपयांची मुसंडी मारली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी उसळी

मागील 20 दिवसांत चांदीत मोठी घडामोडी घडली नव्हती. 5 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. 11 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली होती. तर या आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात 18 ऑक्टोबर रोजी चांदीने 2 हजारांचा डाव साधला. या दरवाढीमुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष