AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा दरवाढीला सलामी, इतके वधारले भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात दरवाढीचे सत्र आरंभले. ग्राहकांची चिंता वाढवली. गेल्या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली होती. त्यानंतर मौल्यवान धातूत वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीत वाढ झाल्याने लग्नसराईत ग्राहकांना जास्त खर्च करावा लागू शकतो. त्यांच्या खिशाला झळ बसू शकते.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पुन्हा दरवाढीला सलामी, इतके वधारले भाव
| Updated on: Dec 20, 2023 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : सोने-चांदीची आगेकूच सुरु आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी दरवाढी झाली होती. हे दरवाढीचे सत्र कायम आहे. लग्नसराईमुळे सध्या बाजार फुलला आहे. अशावेळी या दरवाढीने ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. जागतिक बाजारात दरवाढीला पोषक वातावरण नाही. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार, बडे गुंतवणूकदार त्यांचे धोरण बदलवतील. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतीवर दिसून येईल. डिसेंबर महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. अनेक विक्रम नावावर नोंदवले. या आठवड्यात भाव वधारले आहेत. काय आहेत सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 20 December 2023)?

सोन्याची दरवाढ

आठवड्याच्या सुरुवातीला 19 डिसेंबर रोजी सोन्याने दरवाढीची सलामी दिली. सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. गेल्या आठवड्यात सुरुवातीला सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर सोने 1100 रुपयांनी वधारले. सकाळी अजून भावाची अपडेट आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 300 रुपयांनी वधारली

आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीने 3500 रुपयांची उसळी घेतली होती. 16 डिसेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची घसरण झाली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने जवळपास 200 रुपयांनी तर चांदीत 75 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,084 रुपये, 23 कॅरेट 61,836 रुपये, 22 कॅरेट सोने 56,868 रुपये झाले. 18 कॅरेट 46,563 रुपये, 14 कॅरेट सोने 36,319 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,652 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ.

मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण...

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा.

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार.

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार