.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 20 February 2025 : आरारारा खतरनाक, सोन्याचा दरवाढीचा स्फोट; सर्व रेकॉर्ड गुंडाळले, चांदीने ग्राहकांना तारले

Gold Silver Rate Today 20 February 2025 : सोन्याने तीन दिवसात सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले. सोन्याने मोठी मुलखगिरी केली. तीन दिवसात सोन्याची घोडदौड पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. तर त्यामानाने चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 20 February 2025 : आरारारा खतरनाक, सोन्याचा दरवाढीचा स्फोट; सर्व रेकॉर्ड गुंडाळले, चांदीने ग्राहकांना तारले
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Feb 20, 2025 | 8:32 AM
Share

या आठवड्यात सोन्याने दरवाढीचा स्फोट केला. सोन्याने मोठी कामगिरी केली. या आठवड्यात सलग तीन दिवसात मोठी मजल मारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर चांदीने ग्राहकांना त्यामानाने दिलासा दिला आहे. जागतिक समीकरणं बदलत असताना पण दोन्ही धातुच्या आगेकूचमुळे ग्राहकच नाही तर व्यापारी सुद्धा अचंबित झाले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 20 February 2025 )

सोन्याची तुफान फटकेबाजी

या आठवड्यात सोन्याने दरवाढीचा धमाका केला. सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी वधारले होते. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. तीन दिवसात 1600 रुपयांनी सोन्याने मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा कुरघोडी करण्याचे संकेत मिळत आहेत.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी हजाराची वाढ चांदीने नोंदवली होती. तेव्हापासून चांदीत नरमाईचे धोरण दिसले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,400 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,733, 23 कॅरेट 86,386, 22 कॅरेट सोने 79,447 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,050 रुपये, 14 कॅरेट सोने 50,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,566 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर