AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 20 June 2024 : सोन्यासह चांदीने पण सोडला दरवाढीचा हट्ट; या महिन्यात कोणताच नाही केला रेकॉर्ड

Gold Silver Rate Today 20 June 2024 : सोने-चांदीने गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात पण ग्राहकांना दिलासा दिला. सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने आणि चांदीला मोठी भरारी घेता आली नाही. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 20 June 2024 : सोन्यासह चांदीने पण सोडला दरवाढीचा हट्ट; या महिन्यात कोणताच नाही केला रेकॉर्ड
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jun 20, 2024 | 8:24 AM
Share

ग्राहकांना सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही किंमतीत मोठा बदल झाला नाही. ग्राहकांना खरेदीची मोठी संधी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात मौल्यवान धातूत वाढ झाली होती. या तीन दिवसांत सोने आणि चांदीत चढउतार दिसला. पण किंमतीत मोठा बदल झाला नाही. काय आहे बेशकिंमती धातूंचा भाव (Gold Silver Price Today 20 June 2024 )

सोन्यात घसरणीचे सत्र

या आठवड्याच्या सुरुवातीला 17 जून रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. 18 जून रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाले. 19 तारखेला किंमतीत काही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी घसरली

या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 15 जून रोजी 500 रुपयांनी भाव वधारले. पुढील दोन दिवस भावात बदल दिसला नाही. 18 जून रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर दुसऱ्या दिवशी 19 जून रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत दरवाढ झाली. 24 कॅरेट सोने 71,704 रुपये, 23 कॅरेट 71,417 रुपये, 22 कॅरेट सोने 65,681 रुपये झाले. 18 कॅरेट 53,778 रुपये, 14 कॅरेट सोने 41,947 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,195 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?