Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 21 January 2025 : सोने-चांदीने फुंकली महागाईची तुतारी; Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर किंमती भडकणार?

Gold Silver Rate Today 21 January 2025 : डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्यानतंर आता सोने-चांदीच्या किंमती भडकणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. ट्रम्पमुळे शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीत मोठा बदल झाला आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 21 January 2025 : सोने-चांदीने फुंकली महागाईची तुतारी; Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर किंमती भडकणार?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर तसेच त्यांनी केलेल्या घोषणांचा परिणाम जळगावच्या सुवर्णननगरीवर दिसला.
Follow us
| Updated on: Jan 21, 2025 | 8:52 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं दुसर्‍यांदा हाती घेतली. भांडवलशाही आणि उद्योगांचे हितचिंतक म्हणून ट्रम्प ओळखले जातात. त्यांनी सूत्र हाती घेताच शेअर बाजारासह क्रिप्टो करन्सी बाजाराला आनंदाचे भरते आले आहे. तर आता सोने आणि चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जण किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.  लवकरच बाजारात त्याची प्रतिक्रिया दिसेल.  भारतीय बाजारात सोने वधारले. तर चांदीची किंमत जैसे थे दिसली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव आता असा आहे. (Gold Silver Price Today 21 January 2025 )

सोन्यात दरवाढीचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 1730 रुपयांनी महागले. अखेरच्या सत्रात सोने घसरले होते. 15, 16 आणि 17 जानेवारी रोजी सलग 110, 550 आणि 650 रुपयांनी सोने महागले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 120 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत तीन दिवसांपासून शांतता

गेल्या आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महागली. तर 2 हजारांनी किंमती उतरल्या. 18 जानेवारीपासून आतापर्यंत तीन दिवसांत चांदीत कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,345 23 कॅरेट 79,027, 22 कॅरेट सोने 72,680 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,509 रुपये, 14 कॅरेट सोने 46,417 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,200 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.