AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 January 2025 : सोने-चांदीची कोणती खेळी? काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 22 January 2025 : Donald Trump हे अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येताच व्यावसायिक आणि उद्योग विश्वाला झटका बसला. ट्रम्प यांच्या धोरणाच्या धास्तीने शेअर बाजार घसरला. सराफा बाजारावर काय परिणाम झाला? 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 22 January 2025 : सोने-चांदीची कोणती खेळी? काय आहेत किंमती?
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Jan 22, 2025 | 8:31 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होताच धडाधड आदेश आले. अनेक निर्णयांचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. जागतिक बाजारपेठेत अमेरिकेच्या धोरणांमुळे शेअर बाजाराचे आवसान गळाले. तर दुसरीकडे क्रिप्टो बाजाराला लवकरच भरते येण्याची शक्यता आहे. या दरम्यान सराफा बाजारावर त्याचे काय परिणाम होतात हे लवकरच दिसून येईल. ट्रम्प यांच्या शपथविधी दिनी सोन्याने महागाईची सलामी दिली. तर चांदीत फरक दिसला नाही. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा आता असा भाव आहे. (Gold Silver Price Today 22 January 2025 )

सोन्याने घेतला ब्रेक

गेल्या आठवड्यात सोन्याने 1730 रुपयांची आघाडी घेतली होती. तर 15, 16 आणि 17 जानेवारी रोजी सलग 110, 550 आणि 650 रुपयांची सोन्याने घौडदौड केली. या सोमवारी 120 रुपयांनी किंमती वधारल्या. तर काल किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत कोणताही बदल नाही

मागील आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महागली. तर 2 हजारांनी किंमती उतरल्या होत्या. 18 जानेवारीपासून आतापर्यंत चार दिवसांत चांदीत कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 79,453, 23 कॅरेट 79,135, 22 कॅरेट सोने 72,779 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,590 रुपये, 14 कॅरेट सोने 46,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ