Manoj Jarange : ‘तो’ सीसीटीव्ही पुरावा समोर येताच, मनोज जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंवर डागली तोफ, पंकजा मुंडेंबद्दल मोठं विधान
Manoj Jarange Attack on Dhananjay Munde : अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्यानंतर संतोष देशमुख खून प्रकरणातील मोक्का लागलेले सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसले. या CCTV ने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्यापूर्वी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली होती. याविषयीसंदर्भातील एक सीसीटीव्ही पुरावा समोर आला आहे. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या CCTV ने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.
धनंजय मुंडेंवर जहरी टीका
यावेळी जरांगे यांनी धनंजय मुंडेवर जहरी टीका करण्यात आली. सीसीटीव्ही मधील सर्व आरोपी पाहून खरंच धक्कादायक आणि चीड येणार आहे. राज्याने अशा गुंडगिरीचा आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या या अगोदर बघितल्या होत्या. काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे, असा घणाघात त्यांनी घातला. आजचा व्हिडिओ तर खूप धक्कादायक आहे. एका जागेवर बसून खंडणी मागायचा आणि खून करायचा जर कट शिजवण्यात येतो. एक मंत्री संघटित गुन्हेगारीला पाठबळ देतो. खंडणी मागणारे आणि आरोपी हे एकच असल्याचे जरांगे म्हणाले.




कट रचणारे पण समोर आले पाहिजे
खंडणी मागायला लावणारी वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम आणि हे सर्व करून घेणार म्होरक्या अशा तीन टीम या गुन्ह्यात असल्याचे जरांगे म्हटले. खंडणी मागणारा पेक्षा सामूहिक कट रचणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. हा मुख्य आरोपी झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
विष्णू चाटेचा फोन कसा सापडत नाही?
मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगणे आहे खून आणि खंडणी प्रकरणातील फरार असलेले आरोपी कोणाच्या संपर्कात होते, याचे सीडीआर समोर आले पाहिजे. त्या काळात कोणत्या मंत्र्यांनी फोन केले हेही समोर आले पाहिजे.. विष्णू चाटेने फोन फेकून दिला तो कसा सापडत नाही, असा सवाल जरांगे यांनी विचारला.
आता कुणी सुटणार नाही
सीसीटीव्हीचा पुरावा समोर आले ही चांगली गोष्ट झाली. कट शिजत असतानाचे फुटेज बाहेर आले. आत्ता कुणाला सुटता येणार नाही.एकाचीही जामीन होता कामा नये.. देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. सुटून आल्यावर हे कुटुंबाचा मर्डर करू शकतात, असे जरांगे म्हणाले. गृह विभाग वाल्मिक कराडला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाल्मिक कराडची मालमत्ता ही सरकारमधी एका मंत्र्याची संपत्ती असल्याचा आरोप पण त्यांनी केला.
पंकजा मुंडेंचा संबंध नाही
धनंजय मुंडे यांची टोळी डुप्लिकेट काम करत आहे. आरोपीच्या बाजूने मोर्चे काढत आहेत. आरोपीचे पाठ राखण करत आहेत. मग जातीतीवाद कोण करतंय, असा सवाल त्यांनी विचारला. आमच्यातही आरोपी असतील पण आता नवीन पायंडा पडत आहे. धनंजय मुंडे यांची टोळी आरोपीच्या बाजूने उभे राहत आहे, असा आरोप त्यांनी केला. संतोष देशमुख प्रकरणात पंकजा मुंडे यांचा या काहीही इंटरफेअर नाही, असे ते म्हणाले.