AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 23 January 2025 : अरारा खतरनाक, कोण थोपवणार सोन्याचे तुफान, चांदीला ओहोटी, अशा झरझर वधारल्या किंमती

Gold Silver Rate Today 23 January 2025 : अमेरिकेमधील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारपेठेवर दिसला. सोन्याने तुफान घोडदौड आरंभली आहे. तर दुसरीकडे चांदी सुस्तावली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 23 January 2025 : अरारा खतरनाक, कोण थोपवणार सोन्याचे तुफान, चांदीला ओहोटी, अशा झरझर वधारल्या किंमती
सोने-चांदीची किंमत काय?
| Updated on: Jan 23, 2025 | 8:31 AM
Share

अमेरिकेमधील सत्ताबदलाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून आला. अनेक व्यावसायिक आणि उद्योग धोरणांना डोनाल्ड ट्रम्प सरकारने तडाखा दिला आहे. लाखो भारतीयांवर त्याचा थेट परिणाम दिसेल. तर सध्या सोन्याने मोठी घोडदौड आरंभली आहे. तर चांदी सुस्तावली आहे. या दोनच दिवसात सोन्याने हजार रुपयांची झेप घेतली आहे. तर चांदीला चार दिवसापासून सूर गवसलेला नाही. ऐन लग्नसराईत सोने महागल्याने वधू-वराकडील मंडळी धास्तावली आहेत. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 23 January 2025 )

सोन्यामध्ये आले तुफान

मागील आठवड्याप्रमाणेच सोन्याने तडाखेबंद खेळी दाखवली. या सोमवारी सोने 120 रुपयांनी वधारले. एक दिवसाच्या ब्रेकनंतर काल सोने 860 रुपयांनी उसळले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी सुस्तावली

मागील आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. 18 जानेवारीपासून आतापर्यंत चार दिवसांत चांदीत कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,194, 23 कॅरेट 79,873, 22 कॅरेट सोने 73,458 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,146 रुपये, 14 कॅरेट सोने 46,914 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,248 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?