AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 25 February 2025 : सोन्यासह चांदी चमकली, काय आहेत आता किंमती, असा बसला ग्राहकांना फटका

Gold Silver Rate Today 25 February 2025 : या आठवड्यात सोन्यासह चांदीने फटकेबाजी केली. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस सोन्याने दणक्यात सुरुवात केली होती. तर चांदी नरमली होती. या आठवड्यात दोन्ही धातु वधारले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 25 February 2025 : सोन्यासह चांदी चमकली, काय आहेत आता किंमती, असा बसला ग्राहकांना फटका
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील.
| Updated on: Feb 25, 2025 | 8:51 AM
Share

गेल्या आठवड्यात सोन्याने तडाखेबंद खेळी खेळली होती. सलग चार दिवस सोने चकाकले होते. सोन्याने दोन हजारांची मोठी झेप घेतली होती. तर चांदी नरमली होती. या सोमवारी दोन्ही मौल्यवान धातुत मोठी दरवाढ झाली. दोन्ही धातुची नवीन विक्रमाकडे घोडदौड सुरू आहे. त्यामुळे ऐन विवाह मुहूर्तात ग्राहकांच्या खिशाला जबरी फटका बसण्याची दाट शक्यता आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 25 February 2025 )

सोन्याचे महागाईचे कवित्व

गेल्या आठवड्यात सोन्याने दोन हजारांची घोडदौड केली. सोमवार ते गुरुवारपर्यंत तुफान फटकेबाजी केली. तर या सोमवारी सोने शंभर रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,690 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी चकाकली

या आठवड्यात चांदीने मोठी फटकेबाजी केली. यापूर्वी चांदीत मोठी उलथापालथ दिसली नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 100 रुपयांची घसरण झाली होती. तर या सोमवारी चांदीत 500 रूपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,400, 23 कॅरेट 86,054, 22 कॅरेट सोने 79,142 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,800 रुपये, 14 कॅरेट सोने 50,544 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,115 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...