AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 25 July 2024 : आनंदवार्ता, सराफा बाजाराला स्वस्ताईचे भरते; सोने-चांदीच्या इतक्या कमी झाल्या किंमती

Gold Silver Rate Today 25July 2024 : सीमा शुल्कात कपातीचा निर्णय सराफा बाजाराच्या पथ्यावर पडला आहे. हे बजेट सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पावले आहे. 23 जुलै रोजी मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवल्या गेली. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 25 July 2024 : आनंदवार्ता, सराफा बाजाराला स्वस्ताईचे भरते; सोने-चांदीच्या इतक्या कमी झाल्या किंमती
सोने आणि चांदी झाले स्वस्त
| Updated on: Jul 25, 2024 | 8:30 AM
Share

सोने-चांदी ग्राहकांना या बजेटमध्ये मोठा दिलासा मिळाला. 23 जुलै रोजी मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवल्या गेली. तर 18 जुलैपासून मौल्यवान धातूंनी दरवाढीला ब्रेक दिला आहे. त्यातच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात या धातूवरील सीमा शुल्कात मोठी कपात केली. 15 टक्क्यांहून हा कर आता 6 टक्के करण्यात आल्याने सराफा बाजारात चैतन्य आले आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा दोन हजारांनी सोने स्वस्तात खरेदीची संधी आली आहे. तर चांदीत 23 जुलै रोजी 3 हजारांची घसरण झाली. या आठवड्यातही घसरण सुरु आहे. असा आहे दोन्ही धातूचा भाव? (Gold Silver Price Today 25 July 2024 )

सोन्यात झाली इतकी घसरण

गेल्या 18 जुलै, गुरुवारपासून सोन्याचा भाव उतरला आहे. या सात दिवसांत दरवाढ झालेली नाही. 22 जुलै रोजी सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले. 23 जुलै रोजी 300 रुपयांनी किंमत उतरली. काल भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात सोन्याने स्वस्ताईचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण

जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात चांदीने मोठी कामगिरी बजावली होती. किंमतीत मोठी वाढ दिसली होती. आता चांदीची चमक उतरली आहे. सोमवारी किंमती स्थिर होत्या. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी घसरली. 24 जुलै रोजी 500 रुपयांनी भाव उतरले. आज सकाळच्या सत्रात चांदीने पांढरे निशाण फडकावले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,151, 23 कॅरेट 68,874, 22 कॅरेट सोने 63,342 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,863 रुपये, 14 कॅरेट सोने 40,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 84,862 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...