AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 26 July 2024 : चांदीत रेकॉर्डब्रेक घसरण, सोन्यात स्वस्ताई, खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, असा आहे भाव

Gold Silver Rate Today 26 July 2024 : चांदीत या तीन दिवसांत विक्रमी घसरण झाली. सोन्याने पण सलग दहा दिवसात दरवाढीला ब्रेक दिला. ग्राहकांना सध्या या मौल्यवान धातूची खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 26 July 2024 : चांदीत रेकॉर्डब्रेक घसरण, सोन्यात स्वस्ताई, खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, असा आहे भाव
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Jul 26, 2024 | 8:31 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. चांदीत तर या तीन दिवसांत विक्रमी घसरण झाली. सोन्याने पण सलग दहा दिवसांत कोणतेही आगेकूच केलेली नाही. बजेटच्या कालावधीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मौल्यवान धातूच्या किंमतीत कोणतेही मोठी वाढ झाली नाही. सीमा शुल्क कपातीचा मोठा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला. ग्राहकांना सध्या स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आहे. काय आहेत आता या धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 26 July 2024 )

सोन्यात आली स्वस्ताई

18 जुलैपासून सोन्यात स्वस्ताई आहे. जवळपास दहा दिवसांत दरवाढ नोंदवलेली नाही. या आठवड्यात 22 जुलैला सोने 120 रुपयांनी तर 23 जुलैला 300 रुपयांनी स्वस्त झाले. 25 जुलै रोजी त्यात 100 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळच्या सत्रात सोने स्वस्ताईचा डंका वाजवत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 7 हजारांची घसरण

या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी झेप घेतली होती. सोमवारी किंमती स्थिर होत्या. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी घसरली. 24 जुलै रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीने पांढरे निशाण फडकावले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,227, 23 कॅरेट 67,954, 22 कॅरेट सोने 62,496 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,170 रुपये, 14 कॅरेट सोने 39,913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,474 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...