AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 26 May 2024 : चांदीने सपाटून खाल्ला मार, सोन्यातही ग्राहकांना दिलासा, असे आहेत भाव

Gold Silver Rate Today 26 May 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला. सोन्याने 75 हजारांटा टप्पा ओलांडला, तर चांदी थेट 96 हजारांच्या घरात पोहचली होती. आता किंमतीत मोठी घसरण आली आहे.

Gold Silver Rate Today 26 May 2024 : चांदीने सपाटून खाल्ला मार, सोन्यातही ग्राहकांना दिलासा, असे आहेत भाव
सोने आणि चांदी झाली स्वस्त
| Updated on: May 26, 2024 | 8:28 AM
Share

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला. सोन्याने मोठी घौडदौड केली. तर चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण तेजीचे हे सत्र कायम राहिले नाही. गेल्या पाच दिवसांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 6 हजारांची पडझड झाली. या आठवड्याच्या अखेरीस अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 26 May 2024 )

सोने 2700 रुपयांनी उतरले

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने 75 हजारांचा टप्पा पार केला. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी महागले. त्यानंतर त्यात पडझड झाली. 21 मे रोजी 650 रुपये, गुरुवारी 1100 रुपये तर 24 मे रोजी 980 रुपयांची घसरण झाली. 22 आणि 25 मे रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 6 हजारांनी स्वस्त

गेल्या दोन आठवड्यांत चांदीने 12,000 हून अधिकची चढाई केली. त्यानंतर चांदीत 6 हजारांची स्वस्ता आली. 20 मे रोजी 3500 , 21 मे रोजी 1900, 22 मे रोजी 1200 रुपयांनी तर 23 मे रोजी किलोमागे चांदीचा भाव 3300 रुपयांनी खाली आला. 24 मे रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,028 रुपये, 23 कॅरेट 71,740 रुपये, 22 कॅरेट सोने 65,978 रुपये झाले. 18 कॅरेट 54,021 रुपये, 14 कॅरेट सोने 42,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 89,762 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

Follow Us
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...