AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीत आठवडाअखेर वाढ; आता काय आहेत भाव

Gold Silver Rate Today 27 January 2024 | सोने-चांदीच्या किंमतीत आठवड्याच्या शेवटी वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दरवाढीचा हा ट्रेंड कायम आहे. जानेवारी महिन्यात सोने-चांदीत मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता काय आहेत सोने-चांदीचा भाव

Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीत आठवडाअखेर वाढ; आता काय आहेत भाव
| Updated on: Jan 27, 2024 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली | 27 January 2024 : सोने चमकले तर चांदी लकाकली आहे. आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी दरवाढीचा ट्रेंड जवळपास कायम आहे. डिसेंबरच्या अखेरीस हा ट्रेंड सुरु झाला. तो आजही कायम आहे. आठवड्यातील हे दिवस वगळता या मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र दिसून आले. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. तर गेल्या दोन दिवसांपासून चांदीत चढाईचे सत्र सुरु आहे. सोने पण किंचित वधारले आहे. काय आहेत आता सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 27 January 2024)

सोन्यात किंचित वाढ

जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोन्यात मोठी घसरण झाली. तर आठवड्यातील काही दिवसात मौल्यवान धातूने चढाई केली. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी तीन दिवसांत सूसाट

या महिन्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. तीन दिवसांत एकूण 1800 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.