AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने घसरले, चांदीला आली चमक; अशी आहे भावाबाबत अपडेट

Gold Silver Rate Today 26 January 2024 | प्रजासत्ताक दिनी सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. या महिन्यात सोने-चांदीला मोठी झेप घेता आली नाही. अनेक दिवसांपासून सोने-चांदीत घसरणीचे सत्र आहे. या किंमतीत मध्यंतरी वाढ झाली. आता अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today | सोने घसरले, चांदीला आली चमक; अशी आहे भावाबाबत अपडेट
| Updated on: Jan 26, 2024 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली | 26 January 2024 : प्रजासत्ताक दिनी ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. या आठवड्यातही सोन्याला मोठा पल्ला गाठता आली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस आणि मध्यंतरी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीच्या किंमती वधारल्या. तर इतर दिवशी या मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी पडझड झाली. या जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. आताही सोन्याने घसरणीला ब्रेक लावला तर चांदीने उसळी घेतली आहे. बजेटपूर्वी या मौल्यवान धातूत काय अपडेट येते, हे लवकरच समजेल. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 26 January 2024)

सोन्यात झाली घसरण

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली. मध्यंतरी काही दिवस सोन्याच्या किंमती वधारल्या. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी वधारली

या महिन्यात चांदीचा भाव घसरला. ग्राहकांना चांदीने दिलासा दिला. या 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....