AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने वधारले, चांदी घसरली; काय किंमतीतील अपडेट

Gold Silver Rate Today 25 January 2024 | सोने-चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. सोन्याची किंमत वधारली आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोने -चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. त्याला सोन्याने ब्रेक लावला. तर चांदीत नरमाई कायम आहे. काय आहेत आता मौल्यवान धातूची किंमत?

Gold Silver Rate Today | सोने वधारले, चांदी घसरली; काय किंमतीतील अपडेट
| Updated on: Jan 25, 2024 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली | 25 January 2024 : या जानेवारी महिन्यात सोने-चांदीत नरमाईने ग्राहकांना दिलासा दिला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील ही घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली. या जानेवारी महिन्यात सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. तर या महिन्याभरात 6 ते 7 दिवस सोने-चांदीचा भाव वधारला. आताही सोन्याने घसरणीला ब्रेक लावला तर चांदीत नरमाईचे सत्र आहे. बजेटपूर्वी सोने-चांदीत दरवाढ होते की त्यात अजून घसरण होते, हे या आठवड्यात समजेल. काय आहे सोने-चांदीच्या किंमतीतील अपडेट (Gold Silver Price Today 25 January 2024)

काय आहे सोन्याचा भाव

जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतींनी मोठा दिलासा दिला. प्रत्येक आठवड्यात सोन्यात घसरण झाली. तर काही दिवस सोन्याच्या किंमती वधारल्या. या महिन्यात सोने 2150 रुपयांनी उतरले. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, 19 जानेवारी 330 रुपयांनी तर 20 जानेवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली होती. तर या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी भाव काय

चांदीने ग्राहकांची चांदी केली. या महिन्याच्या सुरुवातीला चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मध्यंतरी चांदी 1400 रुपयांनी महागली. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. त्यानंतर भाव जैसे थे होते. 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,591 रुपये, 23 कॅरेट 62,340 रुपये, 22 कॅरेट सोने 57,333 रुपये झाले. 18 कॅरेट 46,943 रुपये, 14 कॅरेट सोने 36,616 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,072 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी