AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 27 June 2024 : ग्राहकांसाठी सुवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई, असा झरझर उतरला भाव

Gold Silver Rate Today 27 June 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोन्याचा भाव तर 400 रुपयांनी उतरला आहे. तर चांदीत पण घसरण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून ग्राहकांना किंमतीत दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today 27 June 2024 : ग्राहकांसाठी सुवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई, असा झरझर उतरला भाव
सोने-चांदीत स्वस्ताई
| Updated on: Jun 27, 2024 | 8:30 AM
Share

जून महिना ग्राहकांना पावला आहे. सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्यात सुरुवातीपासून भावात तेजीचे सत्र नव्हते. दोन्ही धातूत नरमाईचे सत्र दिसले. गेल्या दोन आठवड्यातील ट्रेंड या पण आठवड्यात कायम आहे. आता अखेरच्या सत्रात सोने आणि चांदी किती उसळी घेते हे लक्षात येईल. गेल्या दोन आठवड्यात अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीत दरवाढ दिसून आली. आता मौल्यवान धातूच्या अशा आहेत किंमती ? (Gold Silver Price Today 27 June 2024 )

सोने झाले स्वस्त

गेल्या दोन आठवड्यात सोन्याने अखरेच्या सत्रात मुसंडी मारल्याचे दिसून येते. या आठवड्यात 24 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी भावात बदल झाला नाही. बुधवारी 27 जून रोजी 230 रुपयांनी भाव उतरला. तर गुरुवारी सकाळच्या सत्रात किंमती घसरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2000 रुपयांची स्वस्ताई

गेल्या आठवड्यात चांदीत 3000 रुपयांची वाढ नि 2000 रुपयांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 24 जून रोजी 300 रुपये तर 25 जून रोजी 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 26 जून एक हजारांनी किंमती कमी झाल्या. तर गुरुवारी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,267 रुपये, 23 कॅरेट 70,982 रुपये, 22 कॅरेट सोने 65,281 रुपये झाले. 18 कॅरेट 53,450 रुपये, 14 कॅरेट सोने 41,691 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,944 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला