AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 27 March 2025 : घसरणीला ब्रेक! सोने-चांदीची भरारी, काय किंमती?

Gold Silver Rate Today 27 March 2025 : सोने आणि चांदीने गेल्या दोन दिवसात ग्राहकांना दिलासा दिला होता. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर दोन्ही धातुनी ब्रेक घेतला. आता किंमती वधारल्या आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 27 March 2025 : घसरणीला ब्रेक! सोने-चांदीची भरारी, काय किंमती?
सोने आणि चांदी वधारलीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 27, 2025 | 8:39 AM
Share

सोने आणि चांदीने सगल दोन दिवस ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुनी तीन दिवस सलग चढाई केली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन दिवस दरवाढीला ब्रेक मिळाला. आता किंमती वधारल्या आहेत. ब्रेकनंतर दोन्ही धातुनी मोठी भरारी घेतली. 21 मार्चपासून स्वस्ताई आली होती. त्याला आता ब्रेक लागला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 27 March 2025 )

सोन्याची दरवाढ

सोमवार आणि मंगळवारी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोने दोन दिवसात अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोने 110 रुपयांनी सोने वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 1000 रूपयांची भरारी

21 मार्चपासून चांदीत 4100 रुपयांनी स्वस्ताई आली. सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी 1000 रूपयांनी वधारली. .गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 87,791, 23 कॅरेट 87,439, 22 कॅरेट सोने 80,417 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,843 रुपये, 14 कॅरेट सोने 51,358 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,794 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

जळगावमध्ये चांदी चमकली

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल 1 हजार 400 रुपयांची वाढ झाली. तर सोने भावात 100 रुपयांनी वधारले. चांदीचे दर 99 हजार 800 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत तर सोन्याचे दर 88 हजार 200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गुढीपाडवाच्या मुहूर्तापूर्वीच चांदीचे भाव वधारल्याने मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव किती होतात, याकडे लक्ष लागलेले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल