AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 December 2024 : सोने-चांदीचा भाव काय? खिशाला बसणार फटका की सराफा बाजार पावणार

Gold Silver Rate Today 28 December 2024 : सराफा बाजारात सोने आणि चांदीची आता काय किंमत आहे? गेल्या 15 दिवसात या मौल्यवान धातुत मोठा उलटफेर झाला. किंमती वधारल्या, तितक्याच उतरल्या. गेल्या आठवड्यात किंमतीत पडझड झाली होती. आता किती वधारली किंमत?

Gold Silver Rate Today 28 December 2024 : सोने-चांदीचा भाव काय? खिशाला बसणार फटका की सराफा बाजार पावणार
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Dec 28, 2024 | 8:41 AM
Share

गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात सोने 600 रुपयांनी महागले तर चांदी 1100 रुपयांनी महागली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धातुला सूर गवसला नाही. जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात दोन्ही धातुत मोठा उलटफेर झाला नाही. आता अशा आहेत या बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 28 December 2024 )

सोने 600 रुपयांनी वधारले

या आठवड्यात सुरुवातीला सोने सुस्तावले. तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपये, 26 डिसेंबर रोजी 280 रुपये, तर 27 डिसेंबर रोजी 270 रुपये असे एकूण 600 रुपयांहून अधिकने सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी एक हजाराने उसळली

मागील आठवड्यात चांदी 6,500 रुपयांनी वधारली तर 5 हजारांनी स्वस्त झाली होती. या आठवड्यात या धातुत पडझडीचे सत्र दिसले. 23 डिसेंबर रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी वधारली. 26 डिसेंबर रोजी त्यात 1 हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,436, 23 कॅरेट 76,130, 22 कॅरेट सोने 70,015 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,327 रुपये, 14 कॅरेट सोने 44,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,831 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच