AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्यात दोन्ही धातूंनी 4 हजारांची विक्रमी चढाई केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. या दिवाळीत जम के सोने खरेदी करण्याच्या इच्छेला सुरुंग लागला. मौल्यवान धातूत मोठी दरवाढ झाली आहे. सोने-चांदीने आता आनंदवार्ता आणली आहे.

Gold Silver Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने-चांदीत आली स्वस्ताई
| Updated on: Oct 28, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : दिवाळीपूर्वीच सोने-चांदीने झरझर दरवाढ केली. त्यामुळे अनेकांच्या खरेदीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत मोठी घसरण आली होती. दिवाळीपर्यंत त्यात आणखी घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज होता. इस्त्राईल-गाजा युद्धाने या सर्व योजनेला सुरुंग लागला. दिवाळीत जम के सोने-चांदी खरेदीची योजना बारगळली. कारण या महिन्यात दोन्ही धातूंनी (Gold Silver Price Today 28 October 2023) 4 हजारांची चढाई केली. जागतिक स्तरावर आणि वायदे बाजारात सोने तेजीत असले तरी सराफा बाजारात त्याने गिरकी घेतली.

आठवडाभरात सोन्यात तेजी

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात सोन्याने 500 रुपयांची चढाई केली. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी घसरल्या होत्या. 24 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढला. 25 ऑक्टोबर रोजी 110 तर 26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत 160 रुपयांची तेजी आली. शुक्रवारी भावात बदल दिसला नाही. आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

चांदीत घसरण

या आठवड्यात चांदीत घसरण दिसून आली. 23 ऑक्टोबर रोजी भाव 200 रुपयांनी घसरले. 24 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 26 ऑक्टोबर रोजी चांदीने 500 रुपयांची चढाई केली. 27 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,984 रुपयांहून 60,825 रुपयांवर घसरले. 23 कॅरेट 60,740 रुपयांहून 60,581 रुपयांवर आले. 22 कॅरेट सोने 55,861रुपयांहून 55,716 रुपयांपर्यंत खाली आले. 18 कॅरेट 45,619 रुपये, 14 कॅरेट सोने 35,583 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीत 654 रुपयांची घसरण झाली. भाव 70,906 रुपयांपर्यंत घसरले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?