AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 December 2024 : वर्षाच्या अखेरीस सोने स्वस्त, तर चांदी इतकी वधारली, भाव तर जाणून घ्या

Gold Silver Rate Today 29 December 2024 : या वर्षात सोने आणि चांदीत मोठी उलथापालथ दिसली. सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तर या महिन्यात उसळी घेतलेल्या दोन्ही धातुना या 15 दिवसात मोठी भरारी घेता आलेली नाही.

Gold Silver Rate Today 29 December 2024 : वर्षाच्या अखेरीस सोने स्वस्त, तर चांदी इतकी वधारली, भाव तर जाणून घ्या
मागील बजेटमध्ये सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांहून कमी करून 6 टक्के करण्यात आले होते. जुलै 2013 नंतरची ही सर्वात मोठी कपात होती. त्याचा मोठा फायदा भारतीय सराफा बाजाराला झाला.
| Updated on: Dec 29, 2024 | 8:32 AM
Share

वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुचा तोरा वाढला होता. या वर्षात सोने आणि चांदीत मोठी उलथापालथ दिसली. सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तर डिसेंबरच्या मध्यानंतर दोन्ही मौल्यवान धातुला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. या 15 दिवसात मोठी उभारी घेता आलेली नाही. किंमतीत चढउताराचे सत्र आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 29 December 2024 )

सोन्याचा तोरा उतरला

या महिन्यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याचा तोरा दिसून आला. या काळात सोने उच्चांकावर असल्याचा दावा गुडरिटर्न्सने आलेखाद्वारे केला आहे. त्यानंतर जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात 25 डिसेंबरला 100 रुपये, 26 तारखेला 280 रुपये, तर 27 डिसेंबर रोजी 270 रुपये असे एकूण 650 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

गुडरिटर्न्सनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याप्रमाणेच चांदीने मोठी झेप घेतली. त्यानंतर मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसले. या आठवड्यात  23 डिसेंबर रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी वधारली. 26 डिसेंबरला चांदी 1 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,436, 23 कॅरेट 76,130, 22 कॅरेट सोने 70,015 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,327 रुपये, 14 कॅरेट सोने 44,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,831 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा