Gold Silver Rate Today 30 May 2024 : तीन दिवसांत चांदी 6,000 रुपयांनी तर सोन्यात झाली इतकी दरवाढ, भाव तरी काय

Gold Silver Rate Today 30 May 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदी महागाईवर स्वार झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. चांदीने सहा हजारांची मुसंडी मारली. तर सोन्याने पण मोठी घौडदौड केली. अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 30 May 2024 : तीन दिवसांत चांदी 6,000 रुपयांनी तर सोन्यात झाली इतकी दरवाढ, भाव तरी काय
चांदीचा षटकार, सोन्याचा चौकार
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 8:28 AM

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यातील स्वस्ताईची कसर या आठवड्याच्या सुरुवातीलाच भरुन काढली. सुरुवातीच्या तीन दिवसांतच चांदीने मोठी झेप घेतली. सोने पण महागाईवर स्वार झाले. चांदी या तीन दिवसांत 6000 रुपयांहून अधिकने वधारली. तर सोन्याने पण तीन दिवसांत मोठा पल्ला गाठला. चांदी किलोमागे लाखाच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. तर सोने पण 75,000 हजारांचा टप्पा ओलांडून नवीन उच्चांक करण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था व्यक्त करत आहेत. सध्या बेशकिंमती धातूची अशी आहे किंमत (Gold Silver Price Today 30 May 2024 )

सोने झाले महाग

गेल्या आठवड्यात सोन्यात 2700 रुपयांची पडझड झाली होती. या आठवड्यात ही कसर भरुन काढण्यासाठी सोन्याची घौडदौड सुरु आहे. 27 मे रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 28 मे रोजी 220 रुपयांची भर पडली. तर 29 मे रोजी 270 रुपयांनी किंमतीत वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा षटकार

गेल्या आठवड्यात चांदी 6 हजाराने स्वस्त झाली होती. या तीन दिवसांत ही कसर भरुन काढण्यात आली. 27 मे रोजी चांदीत 1500 रुपयांची वाढ झाली. 28 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मुसंडी मारली. तर 29 मे रोजी किंमतीत 1200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीचा भाव वधारला. 24 कॅरेट सोने 72,413 रुपये, 23 कॅरेट 72,123 रुपये, 22 कॅरेट सोने 66,330 रुपये झाले. 18 कॅरेट 54,310 रुपये, 14 कॅरेट सोने 42,362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 94,118 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
]जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित, सरकारला काय दिला अल्टिमेटम?
]जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित, सरकारला काय दिला अल्टिमेटम?.
उद्धव ठाकरेंच काय करायच ते करा, पण..राज यांनी शाहांना काय सांगितल होत?
उद्धव ठाकरेंच काय करायच ते करा, पण..राज यांनी शाहांना काय सांगितल होत?.
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा.
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.