Gold Silver Rate Today 31 July 2024 : गुडन्यूज, सोने-चांदीत आली स्वस्ताई, काय आहेत आता किंमती

Gold Silver Rate Today 31 July 2024 : सोने आणि चांदीच्या किंमतीत दोन दिवसात दरवाढ झाली. तर आठवड्याच्या मध्यंतरात किंमती घसरल्या. ग्राहकांना मौल्यवान धातूंनी गेल्या काही दिवसांपासून मोठा दिलासा दिला आहे. त्यांना खरेदीची संधी मिळाली आहे.

Gold Silver Rate Today 31 July 2024 : गुडन्यूज, सोने-चांदीत आली स्वस्ताई, काय आहेत आता किंमती
सोने आणि चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 8:26 AM

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा उलटफेर झाला. किंमतीत विक्रमी घसरण झाली. मौल्यवान धातूच्या किंमतीत या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ नोंदवली. त्यामुळे आता पुन्हा किंमती भडकतात की काय अशी चिंता लागली होती. पण दुसऱ्याच दिवशी दोन्ही धातूंनी माघार घेतली. ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली. आता काय आहेत या धातूचा भाव? (Gold Silver Price Today 31 July 2024 )

दरवाढीनंतर सोन्याची माघार

गेल्या दहा दिवसांपासून सोन्यामध्ये घसरणीचे सत्र सुरु होते. अर्थसंकल्पानंतर तर सोन्याच्या किंमतीत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत वाढली. 270 रुपयांची दरवाढ झाली, मंगळवारी भाव 210 रुपयांनी उतरले. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी उतरली

चांदीत गेल्या दोन आठवड्यापासून घसरणीचे सत्र होते. या आठवड्यात 29 जुलै रोजी या घसरणीला ब्रेक लागला. आतापर्यंत चांदीत 7,000 रुपयांची घसरण दिसली. तर सोमवारी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. आज सकाळच्या सत्रातही चांदीने घसरणीचे संकेत दिले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,680, 23 कॅरेट 68,405, 22 कॅरेट सोने 62,911 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,510 रुपये, 14 कॅरेट सोने 40,178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,350 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.