AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 April 2024 : सोने-चांदीने ग्राहकांना दिवसाच दाखवले तारे, 5 ते 7 हजारांनी एकाच महिन्यात खिसा खाली

Gold Silver Rate Today 6 April 2024 : सोने आणि चांदीने ग्राहकांना दिवसाच तारे दाखवले आहे. एकाच महिन्यात सोने 5 हजार रुपयांनी महाग झाले आहे. तर चांदीत 7 हजारांची वाढ झाली आहे.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनची (IBJA) आकडेवारी पाहता ग्राहकांचा मोठा खिसा कापल्या गेला हे आता वेगळं सांगायची गरज आहे का?

Gold Silver Rate Today 6 April 2024 : सोने-चांदीने ग्राहकांना दिवसाच दाखवले तारे, 5 ते 7 हजारांनी एकाच महिन्यात खिसा खाली
सोन्यासह चांदी सूसाट, असा वधारला भाव
| Updated on: Apr 06, 2024 | 8:52 AM
Share

एकाच महिन्यात ग्राहकांना सोने आणि चांदीने दिवसा तारे दाखवले. गुडरिटर्न्सनुसार, एकाच महिन्यात 22 कॅरेट सोन्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव आला. तर 24 कॅरेट सोन्याने किंमतीत नवीन विक्रम केला. एका महिन्यात देशातील सर्वच सराफा पेठांमध्ये या मौल्यवान धातूंनी कहर केला आहे. 3 टक्क्यांच्या जीएसटीनंतर हा आकडा तर गगनाला भिडतो. हौसेला सुद्धा अधिक मौल देण्याची इच्छा नसल्याने अनेक ग्राहक सराफा बाजारातून काढता पाय घेत आहे. सराफा पेठेत लग्नसराई आणि सणांचा शुभ मुहूर्त गाठण्यासाठी काही ग्राहकांनी घाई केली इतकेच. मार्च महिन्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. या चार दिवसांत सोन्याने 2300 रुपयांचा तर चांदीने 4,000 रुपयांचा टप्पा गाठला. 5 एप्रिल रोजीच्या घसरणीचा थोडाबहुत दिलासा मिळाला. आता आशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 6 April 2024)

एकाच महिन्यात मारली मुसंडी

  1. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारी किती खिसा कापल्या गेला हे समोर आणते
  2. 5 मार्च रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 64,598 रुपये होता
  3. 5 मार्च रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा 59,172 रुपये होता
  4. 5 एप्रिल रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 69,882 रुपयांवर पोहचले
  5. 5 एप्रिल रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 64,012 रुपयांवर होते
  6. एक किलो चांदीचा भाव 5 मार्च रोजी 72,265 रुपये इतका होता
  7. एक किलो चांदीचा भाव 5 एप्रिल रोजी 79,096 रुपयांवर पोहचला

सोने 450 रुपयांनी उतरले

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत सोन्याने तुफान फटकेबाजी केली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी उसळले, 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची भाव उतरले. 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी महागले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांची दरवाढ झाली. तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण उतरली

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी चांदीने टॉप गिअर टाकला. 1 एप्रिलला 600 रुपयांची दरवाढ नोंदवली. 2 एप्रिलला किलोमागे चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची भर पडली. 3 एप्रिलला चांदीने 2 हजारांचा टॉप गिअर टाकला. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी भाव वधारला. तर 5 एप्रिल रोजी किलोमागे 300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 81,700 रुपयांपर्यंत खाली आला.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,882 रुपये, 23 कॅरेट 69,602 रुपये, 22 कॅरेट सोने 64,012 रुपये झाले.18 कॅरेट 52,412 रुपये, 14 कॅरेट सोने 40,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,096 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...