AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना चकवले, किंमतीत असा झाला बदल

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना चकवले. दोन्ही धातूंना मोठी झेप घेता आली नाही. पण घसरणीला ब्रेक लागला. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला थोडी झळ बसली. सोने-चांदीच्या किंमतीत असा बदल झाला.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांना चकवले, किंमतीत असा झाला बदल
| Updated on: Aug 06, 2023 | 9:19 AM
Share

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : सोन्या-चांदीने (Gold Silver Price Today) या महिन्याच्या सुरुवातीला एकूणच आनंदवार्ता आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सराफा पेठांमध्ये गर्दी केली होती. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंनी दरवाढीची वर्दी दिली. त्यानंतर सातत्याने किंमती घसरणीवर होत्या. जुलै महिन्यात खरेदीदारांची पावलं उशीरा बाजाराकडे वळली. मे आणि जून महिन्यासारखी जुलै महिन्यात स्वस्ताई नव्हती. सोने-चांदीचा दर वाढला होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली. पण शनिवारी बाजारात दोन्ही धातूंनी ग्राहकांना चकवले. दोन्ही धातूमध्ये वाढ झाली. दोन्ही धातूला मोठी उसळी घेता आली नाही. भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

या आठवड्यात असा बदलला भाव

  1. 1 ऑगस्ट रोजी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली.
  2. 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली.
  3. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या.
  4. 4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
  5. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले.
  6. 22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
  7. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
  8. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीने असे घेतले वळण

जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात चांदी घसरली. ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली. दुसऱ्या दिवशी भावात 700 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. 4 ऑगस्ट रोजी पुन्हा 200 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.5 ऑगस्ट रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 75,100 मोजावे लागतील. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,294 रुपये, 23 कॅरेट 59,057 रुपये, 22 कॅरेट सोने 54,313 रुपये, 18 कॅरेट 44,471 रुपये, 14 कॅरेट सोने 34,687 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,000 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?