AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 February 2025 : सोने लवकरच 90 हजारांच्या घरात? चांदीचा लाखाचा टप्पा, काय आहेत भाव आता?

Gold Silver Rate Today 6 February 2025 : बजेटमध्ये सोने-चांदीवरील करामध्ये कोणतीच कपात न झाल्याने गेल्यावर्षीप्रमाणे भाव कमी होण्याची शक्यता मावळली होती. आता मौल्यवान धातुनी जोरदार चढाई केली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशी आहे किंमत?

Gold Silver Rate Today 6 February 2025 : सोने लवकरच 90 हजारांच्या घरात? चांदीचा लाखाचा टप्पा, काय आहेत भाव आता?
सोने-चांदीची किंमत
| Updated on: Feb 06, 2025 | 8:27 AM
Share

Budget 2025 मध्ये सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात सोन्याने मोठी मजल मारली. तर दुसरीकडे चांदीने नरमाईनंतर पु्न्हा झेप घेतली. काही शहरात तर सोने 800-1000 रुपयांनी वधारले. तर दुसरीकडे चांदी किलोमागे हजारांनी वधारली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 6 February 2025 )

सोन्याची मुसंडी

गेल्या आठवड्याप्रमाणेच सोन्याने या आठवड्यात कमाल दाखवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर मंगळवारी 115 रुपयांनी आणि बुधवारी 1040 रुपयांनी सोने वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखाच्या उंबरठ्यावर

चांदीत जानेवारी महिन्यात डाबडुबलीचा खेळ सुरू होता. काही दिवस तर भाव फ्रीज झाले होते. या आठवड्याच्य पहिल्या दिवशी भाव स्थिर होते. 4 फेब्रुवारी रोजी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. तर बुधवारी चांदी हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 84,657, 23 कॅरेट 84,318, 22 कॅरेट सोने 77,546 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,493 रुपये, 14 कॅरेट सोने 49,524 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,425 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ