AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक! दोन दिवसांत इतके घसरले भाव

Gold Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. जागतिक बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून सोने-चांदीच्या किंमतींवर अनेक दिग्गज गुंतवणूकदारांनी डाव लावला. सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या. गेल्या दोन दिवसांत दिग्गज धातूंच्या किंमतीत मोठी पडझड झाली.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक! दोन दिवसांत इतके घसरले भाव
| Updated on: Dec 07, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी पडझड दिसून आली. जागतिक बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत नशीब आजमावले. सोने-चांदीच्या किंमती पार गगनाला भिडल्या. सोन्याने 67,000 रुपये प्रति तोळ्याचा प्रवास सुरु केला तर चांदी पण ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली. जळगावच्या सुवर्णनगरीपासून ते लातूरच्या सराफा बाजारापर्यंत वाढलेल्या भावांनी वधू पित्याचे टेन्शन वाढवले. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शहरी भागात तर सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनमच्या दागिन्यांची क्रेझ वाढली आहे. या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today 7 December 2023) इतकी घसरण झाली.

असे मोडले रेकॉर्ड

सराफा बाजारात सोने 65 हजारांच्या पुढे गेले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) यावर्षी 4 मे 2023 रोजी सोने सर्वात महाग होते. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि पुढे सोन्याने नवनवीन रेकॉर्ड केले. . 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. पण प्रत्यक्षात अनेक सराफा बाजारात सोने 66,000 रुपयांच्या घरात पोहचले होते. काही शहरात तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती.

दोन दिवसांत मोठी घसरण

या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने घसरले. 5 डिसेंबर रोजी सोने 1000 रुपयांनी घसरले. तर 6 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 1400 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2300 रुपयांनी उतरली

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत चांदीत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,144 रुपये, 23 कॅरेट 61,895 रुपये, 22 कॅरेट सोने 56,924 रुपये झाले. 18 कॅरेट 46,608 रुपये, 14 कॅरेट सोने 36,354 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,268 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा